कोपरगाव तालुका
कोपरगावात अल्पबचत गटांचे धनादेशांचे वाटप संपन्न

जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ संचलित कोपरगाव तालुक्यातील बचत गटांच्या महिलांना मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे यांच्या हस्ते नुकतेच धनादेश वाटप करण्यात आले आहे.
“कोरोना संकटामुळे करण्यात आलेल्या टाळेबंदीचा फटका अनेक उद्योग व्यवसायांना बसला.मात्र अनेक बचत गटाच्या महिलांनी प्रतिकूल काळात देखील आपले उद्योग व्यवसाय सुरळीत सुरु ठेवले हि कौतुकास्पद बाब आहे”-पुष्पाताई काळे,अध्यक्षा प्रियदर्शनी महिला मंडळ.
महिलांमध्ये प्रचंड क्षमता आहे.महिलांकडे असलेली कल्पनाशक्ती व व्यावसायिक कला,गुणांच्या जोरावर त्यांना संधी उपलब्द्ध झाल्यास महिला आर्थिकदृष्ट्या निश्चित सक्षम होतील त्यासाठी बचत गटाच्या महिलांनी उभारलेल्या उद्योग-व्यवसायांना वेळेवर आर्थिक पतपुरवठा मिळवून देण्यासाठी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे व जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे सातत्याने प्रयत्न करीत असतात. जागतिक महिला दिनाचे निमित्ताने तालुक्यातील बचत गटाच्या महिलांना महाराष्ट्र ग्रामीण बँकेतर्फे चाळीस लाख रुपयांचे धनादेश वितरीत करण्यात आले आहे.
कोरोना संकटामुळे करण्यात आलेल्या टाळेबंदीचा फटका अनेक उद्योग व्यवसायांना बसला.मात्र अनेक बचत गटाच्या महिलांनी प्रतिकूल काळात देखील आपले उद्योग व्यवसाय सुरळीत सुरु ठेवले.या महिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सर्च बचत गटाच्या महिलांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घेवून आपले उद्योग व्यवसाय नियमितपणे सुरु ठेवावेत जेणेकरून कर्जाची परतफेड करण्यात अडचणी येणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन पुष्पाताई काळे यांनी यावेळी उपस्थित बचत गटाच्या महिलांना केले आहे.याप्रसंगी सर्व महिला बचत गटांच्या अध्यक्षा,सचिव व सदस्य महिला उपस्थित होत्या.