आरोग्य
कोपरगावात रुग्णवाढ थांबण्याचे नाव घेईना !
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या ०३ हजार २०८ इतकी आहे.तर सक्रिय रुग्णांची संख्या १३४ असून आज पर्यंत ४८ जणांचे कोरोनाने निधन झाले आहे.त्यांचा मृत्यूचा दर हा १.५० टक्के आहे.तर एकूण २१ हजार ८४० जणांचे श्राव तपासणी करण्यात आली आहे.त्यांचा दर दहा लाखांचा दर हा ८७ हजार ०५७ असा राहिला आहे.त्या तपासणीचा बाधित दर हा १४.६९ टक्के आहे.तर उपचारानंतर बरे होणारी संख्या हि ०३ हजार ०२१ इतकी आहे. तर त्यांचा बरे होण्याचा दर ९४.३३ टक्के इतका असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी दिली आहे.
कोपरगाव शहरात आज आलेल्या एकूण ११ बाधित रुग्णांत साईनगर पुरुष वय-४७,साईसीटी महिला वय-४५,सुभद्रानगर येथील पुरुष वय-४७,दोन महिला वय-२८,६५,निवारा दोन महिला वय-४८,२५,शिवाजी रोड पुरुष वय-६२,खडकी पुरुष वय-५०,एस.जी.विद्यालयाजवळ पुरुष वय-४३, महिला वय-३७,आदींचा समावेश आहे.
तर तालुक्यात आज आलेल्या आकडेवारीत बाधित १५ रुग्णांत करंजीत ०१ महिला वय-३८,तर पोहेगाव पुरुष वय-६८,हिंगणी महिला वय- २४,टाकळी पुरुष वय-७५,४५,३०,१६,७८,तर दोन महिला वय-४०,२१,आदींचा समावेश आहे.तर धारणगाव येथे महिला वय-३४,जेऊर पाटोदा दोन पुरुष वय-३९,२२ तर कोळपेवाडी पुरुष वय-२८,ब्राम्हणगाव पुरुष वय-५४,आदींचा समावेश आहे.
दरम्यान कोरोना वाढीचा दर पुन्हा गतवर्षीप्रमाणे उच्चान्क गाठतो का असा संभ्रम तयार झाला आहे.आजपर्यंत कोरोना नीचांकी पातळीवर होता,मात्र आता या पुढील काळात नागरिकांना लग्न,दहावे,अंत्यविधी आदी ठिकाणी गर्दीत जाण्याचे टाळावे लागणार आहे.या खेरीज बाहेर हॉटेल मध्ये जेवण गर्दीची ठिकाणी टाळावे लागणार असल्याचे आवाहन तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले आहे.