कोपरगाव तालुका
रोग प्रतिबंधात्मक औषध फवारणी मशीन लोकार्पण सोहळा संपन्न
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात साई निवारा मित्र मंडळ निवारा यांचे वतीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने
निवारा,सुभद्रानगर,जानकी विश्व,रिद्धी-सिद्धी नगर,येवला रोड,आढाव वस्ती,साई-सिटी,सह्याद्री कॉलनी, द्वारका-नगरी,शंकरनगर,ओमनगर आदि परिसरातील नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहणेसाठी रोग प्रतिबंधात्मक औषध फवारणी मशीन लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांच्या शुभहस्ते पार पडला आहे.
या प्रसंगी शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले याप्रसंगी माजी नगराध्यक्ष सुहासिनी कोयटे कोपरगाव नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे अमृत संजीवनी चेअरमन पराग संधान शिवसेना गटनेते योगेश बागुल माजी नगरसेवक बबलू वाणी, विनोद राक्षे, नगरसेवक संजय पवार,वैभव गिरमे, सामाजिक कार्यकर्ते अकबर भाई शेख,निसर भाई शेख याच बरोबर लक्ष्मीनारायण भट्टड,निवारा सोसायटीचे माजी चेअरमन सुरेंद्र व्यास,अमोल शेठ महापुरे, प्रमोद नरोडे, विष्णुपंत गायकवाड,तुषार आहेर,अमोल राजूरकर, प्रताप जोशी, गौरव अग्रवाल जय पोटे राजेंद्र पाटणकर ज्ञानदेव ससाने पोपट वीर विजय बोथरा जगन्नाथ बैरागी व नंदिनी कदम विमलताई कर्डक आदींसह सर्व स्थानिक नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजक श्री जनार्दन कदम यांनी स्वागत करून सर्वांचे आभार मानले