जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
सामाजिक उपक्रम

कोपरगावात लायन्स डायलिसिस सेंटर चे उदघाटन

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

लायन्स क्लब कोपरगावच्या वतीने संत जनार्दन स्वामी हॉस्पिटल येथे सवलतीच्या दरात अत्यन्त उपयोगी अशा डायलिसिस सेंटर ची सुविधा उपलब्ध झाली असून त्याचा उदघाटन सोहळा, लायन्स क्लबचे प्रांतपाल अभय शास्त्री यांचे शुभ हस्ते मंगळवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी सम्पन्न होणार असल्याची माहिती लायन्स ट्रस्टचे अध्यक्ष लसत्येन मुंदडा क्लब अध्यक्ष सुधीर डागा व जनार्दन स्वामी हॉस्पिटलचे प्रसाद कातकडे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

या सुविधेमुळे परिसरातील डायलिलीस घ्याव्या लागणाऱ्या रुग्णांना सवलतीच्या दरात उपचार मिळणार असून मोठ्या शहरात जाऊन उपचार घेण्यामुळे होणाऱ्या शारिरीक , आर्थिक, मानसिक त्रासातून रुग्ण व नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
लायन्स क्लब कोपरगावचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष असून गेल्या पन्नास वर्षात, लायन्स मूकबधिर,लायन्स पार्क , लायन्स हॉल, नाईट स्कुल,रुग्ण उपयोगी साहित्य केंद्र, अमर धाम येथे सोलर हिटर, शवपेटी, गरजू विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, जयपूर फूट,आरोग्य शिबिरे, लायन्स एक्स्पो या सारख्या अनेक सेवाभावी कार्ये नेहमी चालत असते.
लायन्सच्या सेवाकार्यात तुलसीदास खुबाणी,ठोळे,संदीप कोयटे,संदीप रोहमारे,अभिजित आचार्य,डॉ.संजय उंबरकर,राम थोरे,सुरेश शिंदे व सर्व लायन्स,लायनेस व लिवो सदस्यांचे मोठे योगदान आहे

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close