जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

नितीन औताडेसह चार जणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी !

जाहिरात-9423439946
जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

पोहेगाव नागरी पतसंस्थेचा संस्थापक नितीन औताडे याच्यासह त्याचा भाऊ,मुलगा व पोहेगावचे सरपंच अमोल औताडे यास १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानें पोहेगाव परिसरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान पोहेगावात दारूबंदीच्या विषयाचे तात्कालिक कारण या घटनेमागे असले तरी या हद्दीत आपल्या हितचिंतकांना सवलत तर विरोधकांना कोंडीत पकडण्याचे काम सुरू असले तरी खरे कारण हे ग्रामपंचायत अंतर्गत वर्चस्ववाद हेच मुख्य कारण या मारहाणीमागे असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.त्यामुळे या प्रकरणाची उलटसुलट चर्चा परिसरात सुरू आहे.अशी घटना दुसऱ्यांदा घडली आहे.दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार आदल्या दिवशी पोलिसानी टाकलेल्या धाडीच्या वेळी ऋत्विक औताडे तेथे समक्ष हजर राहून हसल्याने हे प्रकरण वाढले असल्याची माहिती आहे.दरम्यान उशिराने मिळालेल्या माहिती नुसार आज झालेल्या सुनावणीत या चौघांना जामीन झाला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

पोहेगाव नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक माजी माजी पंचायत समिती सदस्य नितीन भानुदास औताडे,त्याचा मुलगा ऋतिक नितीन औताडे,भाऊ तुषार भानुदास औताडे यांच्यासह पोहेगावचे विद्यमान सरपंच अमोल भाऊसाहेब औताडे यास मागील आठवड्यात पोहेगाव येथील नानासाहेब औताडे यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आल्यामुळे कोपरगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की,”पोहेगाव येथील नानासाहेब औताडे यांच्या घरी वास्तूशांतीच्या कार्यक्रमाच्या दिवशी नानासाहेब औताडे यांचा भाऊ किरण औताडे शेतातून कोथींबीर आणण्यासाठी गेले असता त्याच्या शेजारी असलेल्या नागरी सहकारी पतसंस्थेच्या शेतातून जात असतांना मुख्य आरोपी नितीन भानुदास औताडे याचा मुलगा ऋतिक नितीन औताडे याने आमच्या शेतातून जायचे नाही यावरून ऋतिक नितीन औताडे व किरण औताडे यांच्यात बाचाबाची झाली.त्याबाबत ऋतिक औताडे याने आपले वडील नितीन औताडे यांना याबाबत माहिती दिली.दुसऱ्या दिवशी नितीन औताडे यांनी नाना औताडे यांना त्यांच्या सर्व कुटुंबियांना घेवून त्यांच्या मालकीच्या कोपरगाव-संगमनेर रोडवर असलेल्या पेट्रोल पंपावर बोलाविले.त्यावेळी नाना औताडे यांनी आम्ही पेट्रोल पंपावर येणार नाही रस्त्यावर येवू असे सांगून नानासाहेब औताडे त्यांच्या सर्व कुटुंबियांना घेवून रस्त्यावर गेले असता नितीन भानुदास औताडे,त्याचा मुलगा ऋतिक नितीन औताडे,याचा भाऊ तुषार भानुदास औताडे यांच्यासह पोहेगावचे विद्यमान सरपंच अमोल भाऊसाहेब औताडे यांनी फायटर पंच, काठ्या,कुऱ्हाडी आदी धारदार शस्त्रांचा वापर करून नानासाहेब औताडे यांच्या कुटुंबियांना रक्तबंबाळ केले होते.त्याबाबत नानासाहेब औताडे हे शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल करण्यासाठी गेले असता पोलीस प्रशासनाकडून त्यांची फिर्याद नोंदवून घेण्यास टाळाटाळ करण्यात आली असल्याची माहिती हाती आली आहे.मात्र फिर्याद दाखल करून घेतली नाही तर आपण शिर्डी पोलीस स्टेशनसमोर उपोषणाला बसू असा ईशारा नानासाहेब औताडे यांनी देताच त्यांची फिर्याद दाखल करून घेण्यात आली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.फिर्यादी नानासाहेब औताडे यांनी पत्नीचा मेडिकल रिपोर्ट पोलीस प्रशासनास सादर केला त्यावेळी वरील चारही आरोपींवर भा.द.वी.अन्वये कलम ३२६ गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे पोलिसांना आरोपींना अटक करून.वरील चारही आरोपींना कोपरगाव येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या पुढे उभे केले असता वरील चारही आरोपींना न्यायमूर्ती डोईफोडे यांनी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.सदरच्या भा.द.वी.कलम ३२६ अन्वये आरोपींचे आरोप सिद्ध झाल्यास दहा वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होवू शकते.यावेळी न्यायालयाने तपासी अधिकारी दात्रे यांना यावेळी खडसावले असून १२ तारखेला गुन्हा घडून एवढ्या उशिरा का अटक केली याबाबत विचारणा केली असल्याची माहिती फिर्यादीचे वकील अॅड. विद्यासागर शिंदे यांनी दिली आहे. दरम्यान या प्रकरणी दुसरी फिर्याद ऋत्विक नितीन औताडे याने दाखल केली असून यात त्याने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की,दोन तीन महिन्यांपूर्वी माझे चुलते सरपंच औताडे यांना दारूबंदीच्या बैठकीत नानासाहेब औताडे याने जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती.तसेच दि.११ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास दारू उत्पादन शुल्क विभागाने नानासाहेब औताडे याच्या हॉटेल छत्रपतीवर धाड टाकली होती.व दुसऱ्या दिवशी सकाळी ९.५१ वाजेच्या सुमारास किरण औताडे याने त्याच्या भ्रमंध्वनिवरून ( ९५६१८३८५४६) वरून आपल्याला विचारले,”तू कुठे आहे”माझे तुझ्याकडे काम आहे,मला भेटायला ये” म्हणून बोलावुंन घेतले याची खबर याने आपल्या चुलत्याला अमोल औताडे यास दिली व बोलावून घेतले.त्या नंतर सकाळी १०.१५ वाजेच्या सुमारास साई किसान केंद्राजवळ किरण औताडे याने आपली मोटार सायकल आपल्याला आडवी लावली.व मला शिवीगाळ करून मारहाण सुरु केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.त्याच वेळी त्याने किरण औताडे याने त्याचा भाऊ नानासाहेब औताडे,वडील माधव औताडे,आई मंदाबाई औताडे यांना बोलावून घेतले व शिवीगाळ करून मारहाण करायला लागले त्यावेळी नानासाहेब औताडे याच्या खिशातील चाकू काढून चुलते अमोल औताडे यांना मारत असताना त्यांच्या बोटाला लागले आहे.तेथे जमलेल्या नागरिकांनी आमचे भांडण सोडवले आहे.त्यावेळी तेथून निघून जात असताना नानासाहेब औताडे याने,”तुम्हाला एकालाही जिवंत सोडणार नाही” अशी धमकी देऊन निघून गेला आहे. दरम्यान या घटनेत नानासाहेब औताडे याने त्याच्या छत्रपती हॉटेलवर राज्य दारू उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी धाड टाकल्याच्या कारणावरून राग मनात धरून वरील आरोपीनी आपल्याला व चुलत्याला मारहाण केली असल्याचे म्हटले आहे.याप्रकरणी पोलिसानी आरोपी नानासाहेब औताडे,किरण औताडे,माधव औताडे,मंदाबाई औताडे यांच्या विरोधात गु.र.क्रं.६५/२०२१ भा.द.वि.कलम ३४१,३२४,५०६,५०४,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close