जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

दहिगाव बोलकानजीक अपघात करून कारचालक फरार,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील दहिगाव बोलका शिवारात असलेल्या मुंबई-नागपूर महामार्गावर आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास मंगेश बाळासाहेब जगताप हे आपल्या दुचाकीवरुन (क्रं.एम.एच.१७ बी.डब्ल्यू.५१२५) आपल्या शेतातून महामार्गावर आले असता कोपरंगावकडून भरधाव वेगाने वैजापूरच्या दिशेने जात असलेल्या मारुती स्वीफ्ट कारने त्यांना उडवले असून त्यात त्यांचा एक पाय घोट्यापासून तुटला असून या दुर्घटनेनंतर कार चालक मात्र उलट कोपरगावच्या दिशेने फरार झाला आहे.या प्रकरणी लक्ष्मी मंगेश जगताप यांनी अज्ञात कार चालका विरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान या अपघाताच्या घटनेबाबत कोणाही इसमास कार व कार चालकाबद्दल काही माहिती असल्यास त्याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यास माहिती कळवावी असे आवाहन पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना केले आहे.

मुंबई-नागपूर हा महामार्ग वर्तमानस्थितीत खूपच नादुरुस्त झाला असून या महामार्गावर अनेक अपघात होत आहे.या रस्त्याची दुरुस्ती हा कळीचा मुद्दा असून या बाबत सर्वच राजकीय पक्ष आणि नेते सोयीस्कर दुर्लक्ष करताना दिसत आहे.त्यामुळे अनेकांना आपले जीवित व वित्तीय हानी विनाकारण सोसावी लागत आहे.या बाबत नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही उपयोग झालेला नाही.आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास दहिगाव बोलका शिवारात आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास तेथील शेतकरी हे आपल्या शेतातून काही काम करून आपल्या घराकडे जात असतांना ते आपल्या शेतातून निघून घरी जात असताना त्यांना कोपरगाव कडून वैजापूरच्या दिशेने जाणाऱ्या एका अंदाजे (मारुती स्विफ्ट डिझायर) या गाडीने उडवले आहे.व त्यात त्यांचा एका पायाचा घोट्या पासून थेट तुकडा झाला असून या घटनेनंतर कार चालक हा दुचाकीस्वार हा जखमी अवस्थेत पडला असतांना त्यांची गाडी नादुरुस्त झाल्याने पुढे जाणे अशक्य झाल्याचे ओळखून पुन्हा आपली गाडी उलट्या दिशेने वळवुन फरार झाला आहे.

या घटनेनंतर फिर्यादी महिलेचे पती हे घटनस्थळी पडलेले असतांना त्यांना नजीकच्या नागरिकानी खाजगी रुग्णालयांत उपचारार्थ भरती केले आहे.तर फिर्यादी महिला लक्ष्मी जगताप यांनी या प्रकरणी कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गु.र.क्रं.२९-२०२१ भा.द.वि.कायदा कलम २७९,३३७,३३८,४२७.मो.व.कायदा कलम १८४,१३४,,(अ),(ब),१७७ प्रमाणे अज्ञात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.एम.म्हस्के हे करीत आहेत.

दरम्यान या घटनेबाबत कोणाही इसमास काही माहिती असल्यास त्याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यास माहिती कळवावी असे आवाहन पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close