आंदोलन
ऊस उत्पादकांना प्रतिटनास ७.५ हजारांचा भाव द्या-…यांची मागणी

न्युजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव,राहाता,संगमनेरसह अहिल्यानगर जिल्ह्यातील सहकारी आणि खाजगी साखर कारखानदारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति टन ०७ हजार ५०० रुपयांचा दर द्यायला हवा तरच शेतकऱ्यांचे समाधान होणार आहे अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही;त्याची सर्वस्वी जबाबदारी सहकार विभागाची राहील असा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हा सचिव रूपेंद्र काले यांनी आज कोपरगाव येथे आयोजित धरणे आंदोलनात दिला आहे.

“राज्यातील सहकारी साखर कारखानदार हे विश्वस्त म्हणून कारभार करण्यास शेतकऱ्यांनी निवडून दिले आहे.मात्र तालुक्यातील कारखानदार हे मालक असल्यासारखे वागत असून ही बाब निश्चित कोणाही सुज्ञ व्यक्तीस विचार करण्यास लावणारी आहे.त्यासाठी आम्ही शेतकऱ्यांचा पाठीशी उभे रहाणार असून कारखानदारांनी अद्याप ज्यांनी आपले सोने-नाणे देऊन सहकारी कारखान्याचे भाग खरेदी केले त्यांना भिकेला लावण्याचे काम करत आहे.आज त्यांच्याच मुलाकडून शिक्षणासाठी निर्लज्जपणे डोनेशन मागितले जात आहे.मयत सभासदांचे वारसांना त्यांचे हक्क मिळू दिले जात नाही.त्यासाठी आम्ही शेतकरी संघटनेसोबत राहणार असल्याचे अधोरेखित केले आहे.शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढत असून त्यात तुमचे कोणी काही वाकडे करू शकत नाही” -ॲड.दिलीप लासुरे,अध्यक्ष,कोपरगाव वकील संघ.
“राज्यातील २०२६-२७ च्या गळीत हंगामात ऊस दराचा तिढा अधिकच तीव्र झाला असून,पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत तोडगा निघाला असला तरी मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात शेतकरी संघटनांचे आंदोलन अजूनही पेटलेले आहे.राहुरी,नेवासा आदी तालुक्यातील आंदोलने याची जिती जागती उदाहरणे असून आता हे लोण कोपरगाव,राहाता,श्रीरामपूर,संगमनेर तालुक्यात पोहचले असून आज कोपरगाव तहसील कार्यालयात कोपरगाव तालुका शेतकरी संघटना,कोपरगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट),शिवसेना (उबाठा),काँग्रेस आदींनी या संघटनाच्या वतीने धरणे आंदोलनं आयोजित केले होते त्यावेळी ते बोलत होते.

“कोपरगाव तालुक्यातील सहकारी साखर कारखानदारी ही सध्या लुटणारी टोळी बनली असून त्यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना मालक बनवण्याचे स्वप्न दाखवले पण प्रत्यक्षात त्यांना गुलाम बनवले आहे.त्यामुळे गुलामीच्या साखळ्या आता तोडण्याची वेळ आली आहे.आणि त्यासाठी आता शेतकऱ्यांच्या पाठीशी तालुक्यातील शेतकऱ्यांनी उभे राहावे “श्रीरंग चांदगुडे,तालुकाध्यक्ष,शिवसेना (उबाठा)
सदर प्रसंगी शेतकरी संघटनेचे राज्य प्रसिद्धी प्रमुख नानासाहेब जवरे,शेतकरी संघटनेचे सचिव रूपेंद्र काले,कोपरगाव वकील संघाचे अध्यक्ष ॲड.दिलीप लासुरे,ॲड.रमेश गव्हाणे,ॲड.नितीन पोळ,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन शिंदे,राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष सचिन मुजगुले,भाजपचे माजी तालुकाध्यक्ष सुभाष दवंगे,नामदेवराव जाधव,कोपरगाव शहर शिवसेना,(उबाठा)चे शहर प्रमुख गगन हाडा,माजी उपजिल्हा प्रमुख बाळासाहेब जाधव,माजी शहर प्रमुख अस्लम शेख,तालुका प्रमुख श्रीरंग चांदगुडे,निळवंडे कालवा कृती समितीचे कार्याध्यक्ष गंगाधर रहाणे,शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष धर्मा जावळे,सचिव कैलास गव्हाणे,शिवाजी देवकर,रमेश टेके,नवनाथ जाधव,रावसाहेब करडे,भाऊसाहेब करडे,राजेंद्र काजळे,परशराम टेके,गोरक्षनाथ टेके,अण्णासाहेब टेके,तानाजी थोरमिसे,रामभाऊ ठोंबरे,बबनराव मैराळ,माजी सरपंच विजय थोरात,नवनाथ शिंदे,गोरक्षनाथ शिंदे,भाऊसाहेब थोरात,रखमा वाकचौरे,नवनाथ थोरात,प्रशांत टेके,कान्हेगावचे माजी सरपंच प्रकाश करडे,किरण खर्डे,माधव गव्हाणे,विजय जाधव,शेतकरी संघटनेचे नाटेगाव येथील उपाध्यक्ष ऋत्विक मोरे,बाळासाहेब दहे,नरहरी पाचोरे,साहेबराव रहाणे,दगडू रहाणे,नारायण निरगुडे,रामभाऊ वढणे,राजेंद्र काजळे,राजेंद्र औताडे,निलेश औताडे,अप्पासाहेब कोल्हे,गोरक्षनाथ मोरे,केशव पन्हाळे,विकास गाढे,अंबादास सोनवणे,सुनील दवंगे,विवेक कुलकर्णी,सतीश शेवाळे,शुभम होन,राहुल देवकर,संतोष गायकवाड,तुषार विध्वंस आदीसह बहुसंख्येने शेतकरी उपस्थित होते.

“सहकार आता सहकार राहिला नाही.ज्याचे स्वप्न दाखवले ते भंगले आहे.आता साखर कारखानदारांना ठिकाणावर आणण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे.त्यासाठी कोपरगाव,राहाता,संगमनेर,अकोले तालुक्यात शेतकऱ्यांत जाऊन जागृती करण्याची वेळ आली असून त्यांना कानीकपाळी ओरडून जागृती करावी लागणार असून संघर्ष अटळ बनला आहे,तर भाजप हा लावली केळी आणि आली रताळी,असा पक्ष बनला आहे”-
नामदेवराव जाधव,माजी तालुकाध्यक्ष,भाजप.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”साखर कारखाने शेतकऱ्यांकडून एक टन ऊस खरेदी केल्यानंतर त्याचे पासून सुमारे 120 किलो साखर निर्मिती करत आहे.त्याची आजची किंमत 06 हजार 050 रुपये असून त्याच एक टन ऊसापासून 300 किलो बगॅस निर्मिती होत असून त्याचे बाजार मूल्य 900 रुपये ठरत आहे.याशिवाय याच उसाच्या रसापासून 10 लिटर दारू अथवा इथेनॉल निर्मिती होत आहे.त्याचे नक्त बाजारमूल्य 650 रुपये आहे.तर त्याच एक टनापासून 520 रुपयांची चाळीस किलो मळी निर्माण होत आहे.तर 50युनिट वीज निर्माण होत आहे.त्यातून कारखान्यास 325 रुपयांचे भांडवल कारखाना व्यवस्थापनास मिळत आहे.तर 105 रुपयांचे 35 किलो खत निर्मिती होत आहे असे एक टन ऊसापासून एकूण 08 हजार 550 रुपयांचे उत्पन्न साखर कारखान्यास मिळत आहे.त्यातून तोडणी आणि वहातूक खर्च 900 रुपये,कारखाना अंतर्गत गाळप खर्च प्रतिटन 450 रुपये आणि आणि कारखान्याचा त्यात प्रतिटन 100 रुपयांचा नफा धरला तर 1 हजार 450 रुपये वजा जाता कारखान्याला शेतकऱ्यास देण्यास 07 हजार 500 रुपये मिळत असल्याचा दावा रूपेंद्र काले यांनी केला आहे.आणि नगर जिल्ह्यासह राज्यातील शेतकरी संघटना केवळ कारखान्याकडे प्रतिटन केवळ 04 हजार 500 रुपयांचा दर मागत आहे.नव्हे तो त्यांचा मालक म्हणून अधिकार असल्याचे सांगितले आहे.त्यामुळे या हिशेबाचे शेतकऱ्यांनी स्वागत केले असून कारखान्याने ऊस उत्पादकांना हा दर द्यावा अशी आग्रही मागणी केली आहे.व कारखान्याच्या व्यवस्थापनाने त्याची दखल न घेतल्यास शेतकरी संघटना पुढील मोठ्या आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचे सांगितले आहे.शेतकऱ्यांनी आपल्या हक्कासाठी रस्त्यावर या त्यासाठी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील आणि प्रदेश उपाध्यक्ष ॲड.अजित काळे हे तुमच्या पाठीशी उभे रहाणार असल्याचे सांगीतले आहे.त्याचे शेतकऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले आहे.

दरम्यान शेतकऱ्यांच्या या धरणे आंदोलनाच्या वेळी ईशान्यगडावरून दोन खबरीलाल ( खंडोजी खोपडे) धाडण्यात आले होते.त्यातील एक पत्रकारांमध्ये गडबड करताना आणि चलचित्रण करताना आढळून आला आहे तर दुसरा भिंतीच्या आडून शेतकरी नेत्यांचे रेकॉर्डिंग करताना आढळून आला आहे.त्यावेळी शेतकरी कार्यकर्त्यांनी त्यांना नेमके हेरले होते.त्यामुळे त्यांचे सगळे मुसळ केरात गेले असल्याचे मानले जात आहे.याबाबत कोपरगाव तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान यावेळी कोपरगाव वकील संघाचे अध्यक्ष ॲड.दिलीप लासुरे यांनी,”राज्यातील सहकारी साखर कारखानदार हे विश्वस्त म्हणून कारभार करण्यास शेतकऱ्यांनी निवडून दिले आहे.मात्र तालुक्यातील कारखानदार हे मालक असल्यासारखे वागत असून ही बाब निश्चित कोणाही सुज्ञ व्यक्तीस विचार करण्यास लावणारी आहे.त्यासाठी आम्ही शेतकऱ्यांचा पाठीशी उभे रहाणार असून कारखानदारांनी अद्याप ज्यांनी आपले सोने-नाणे देऊन सहकारी कारखान्याचे भाग खरेदी केले त्यांना भिकेला लावण्याचे काम करत आहे.आज त्यांच्याच मुलाकडून शिक्षणासाठी निर्लज्जपणे डोनेशन मागितले जात आहे.मयत सभासदांचे वारसांना त्यांचे हक्क मिळू दिले जात नाही.त्यासाठी आम्ही शेतकरी संघटनेसोबत राहणार असल्याचे अधोरेखित केले आहे.शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढत असून त्यात तुमचे कोणी काही वाकडे करू शकत नाही असा दिलासा दिला आहे.तुमचा कोपरगाव शहर शिवसेना,(उबाठा)चे शहर प्रमुख गगन हाडा यांनी शिवसेना ही कायम शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या मागे उभी राहणार असून शेतकरी संघटनेला पाठिंबा दिला आहे.याशिवाय तालुका काँग्रेसचे अध्यक्ष नितीन शिंदे यांनी शेतकऱ्यांचा कैवार घेतला असून तोच कित्ता सेनेचे तालुकाध्यक्ष श्रीरंग चांदगुडे यांनी गिरवला असून शेतकऱ्यांना कायम तालुक्यातील नेत्यांनी मागवले असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान यावेळी प्रास्तविक भाजपचे माजी तालुका प्रमुख सुभाष दवंगे यांनी केले आहे.तर उपस्थितांना मार्गदर्शन तालुका प्रमुख श्रीरंग चांदगुडे,माजी भाजपचे तालुकाध्यक्ष नामदेवराव जाधव,ॲड.नितीन पोळ,प्रकाश करडे,बाबासाहेब गाढवे,बाळासाहेब जाधव,प्रशांत टेके आदींनी मार्गदर्शन केले आहे.तर उपस्थितांचे आभार कालवा कृती समितीचे सचिव कैलास गव्हाणे यांनी मानले आहे.



