गुन्हे विषयक
कोपरगाव तालुक्यात महिलेचा विनयभंग,गुन्हा दाखल
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेल्या चाळीस वर्षीय घरकाम करणाऱ्या महिलेच्या घरात दि.सोळा जानेवारी रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास कोणी नाही हे पाहून आरोपी अल्ताफ सिकंदर पटेल रा.कोळपेवाडी याने आपल्याला चहा पाणी कर असे म्हणून घरात प्रवेश करून महिलेचा विनयभंग केल्याने चांदेकसारे शिवारात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी फिर्यादी महिलेने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.फिर्यादी महिला व आरोपी यांची ओळख असून त्याचा गैरफायदा घेत आरोपीने महिलेच्या घरी कोणी नाही हि संधी साधत या महिलेच्या घरात प्रवेश मिळवला असून आपल्याला चहा पाणी कर असे म्हणून फिर्यादी महिलेचा हात धरून तीस जवळ ओढून तिचा विनयभंग केला आहे.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात आरोपी अल्ताफ पटेल याचे विरुद्ध गु.र.क्रं.२०/२०२० भा.द.वि.कलम ३५४,३५४(अ),४५२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एम.ए. कुसारे हे करीत आहेत.