जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

उपग्रह बनवून अवकाशात पाठविण्याच्या उपक्रमात शिवम चव्हाणचा समावेश

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या कुटुंबीयांकडून स्थापन करण्यात आलेल्या डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम इंटरनेशनल फाउंडेशन आणि स्पेस झोन इंडिया यांच्या मार्फत आयोजित केलेल्या स्पेस रिसर्च चॅलेंज २०२१ या उपक्रमांतर्गत १०० उपग्रह बनवून रामेश्वरम् येथुन अंतराळात सोडण्याचा अभिनव प्रयोग करून ७ फेब्रुवारी रोजी संपन्न होत असून त्यात कोपरगाव येथील शारदा इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थी शिवम चव्हाण यास संधी मिळाली आहे.त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

सर्व १०० उपग्रह एका केस मध्ये फिट केलेले असतील.या उपकरणा सोबत पॅरेशूट जी.पी.एस. ट्रॅकिंग सिस्टम,लाईव्ह कॅमेरा जोडलेला असून हे पृथ्वीच्या बाहेरील अवकाशातील प्रत्यक्ष ओझोन,कार्बन-डाय-ऑक्साईड,हवेची शुद्धता,हवेतील प्रदूषण हवेचा दाब आणि इतर माहिती हे पृथ्वीवरील केंद्राला पाठवतील. या सोबत काही झाडांचे बीज सुद्धा पाठविण्यात येणार आहेत.

सूर्य,चंद्र,तारे,ग्रह व उपग्रहांचा अभ्यास म्हणजे खरं तर सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या आवाक्या बाहेरचा विषय.पण विद्यार्थ्यांचे हेच स्वप्न सत्यात उतरणार असून,एकाच दिवशी इंडिया रेकॉर्ड,आशिया रेकॉर्डसह वल्ड रेकॉर्ड भारताचे उपराष्ट्रपती,तमिळनाडू राज्याचे राज्यपाल,अंतराळ संस्थेचे चेअरमन व इस्त्रो येथील शास्त्रज्ञ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे.या १०० उपग्रह बनविण्याच्या विश्वविक्रमात १ उपग्रह बनवुन सहभागी होण्याची संधी महाराष्ट्र राज्यातुन कोपरगाव येथील शारदा इंग्लिश मीडियम स्कूलचा इयत्ता १० वीत शिक्षण घेणारा विद्यार्थी शिवम संदीप चव्हाण यास मिळाली आहे.शिवम हा कोपरगाव तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर शंकरराव काळे माध्यमिक विद्यालय करंजी येथील कला शिक्षक संदिप चव्हाण या मुलगा आहे.

जगातील सर्वात कमीत कमी २५ ग्रॅम ते जास्तीत जास्त ८० ग्रॅम वजनाचे १०० उपग्रह बनवून आणि त्यांना ३५ ते ३८ हजार मीटर उंचीवर सायंटिफिक हेलियम बलुन च्या सहाय्याने पृथ्वी च्या समकक्षेत अवकाशात प्रस्तापित केले जाणार आहे.या उपग्रह निर्मितीकरिता महाराष्ट्रातून १०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.या मिशनअंतर्गत शंभर उपग्रह बनवून हेलियम बलूनद्वारे अवकाशात झेपावणार आहेत.त्यामुळे स्पेस रिसर्च पेलोड क्युब्ज प्रकारचा उपग्रह म्हणजे काय?, त्याचे विविध भाग कुठले?,त्यांचे कार्य कसे चालते? हेलियम बलून म्हणजे काय? या प्रकारचे उपग्रहाचे बाहेरील कवच कुठल्या वस्तूंचा वापर करून बनवतात?,या उपग्रहात कुठले सेन्सर असतात? कुठले सॉफ्टवेअर कसे काम करते? याची सर्व माहिती या सर्व विद्यार्थ्यांचे उपग्रह बनविण्याच्या संदर्भातील ऑनलाईन प्रशिक्षण जानेवारी महिन्यात पूर्ण झाले असून प्रत्यक्ष उपग्रह बनविण्याचा एक दिवसीय उपक्रम नागपूर व पुणे या ठिकाणी आयोजित केलेला आहे.यात विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष उपग्रह बनवून घेऊन त्याची चाचणी करण्यात येणार आहे.
यामुळे कृषी विभागात अवकाशातील शेती करण्याच्या संशोधनास मदत मिळणार आहे.या उपक्रमात महाराष्ट्र चे नेत्वृत डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम इंटरनेशनल फाउंडेशन रामेश्वरम चे महाराष्ट्र समन्वयक मनिषा चौधरी,सचिव मिलिंद चौधरी हे करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close