जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

उद्याच्या जनता दरबाराकडे तालुक्याचे लक्ष लागून ?

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव –(नानासाहेब जवरे) 

   कोपरगाव तहसील कार्यालयाच्या सभागृहात उद्या दि.५ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १२.आमदार विवेक कोल्हे यांचा लोकसंवाद उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.यासाठी तालुक्यातील सर्व शासकीय विभागांचे अधिकारी या वेळी उपस्थित राहणार असून नागरिकांनी या उपक्रमास प्रतिसाद द्यावा असे आवाहन आ.कोल्हे यांनी एक प्रसिद्धी पत्रकान्वये नुकतेच केले आहे.त्यामुळे या पहिल्याच जनता दरबाराकडे तालुक्यातील नागरिकांचे आणि विरोधकांचेही लक्ष लागुन राहिले आहे.

माजी स्व.मंत्री शंकरराव कोल्हे यांचे काळात त्याची प्रशासनावर मजबूत पकड होती.त्यामुळे सत्ताधारी कार्यकर्ते येत पण विरोधकच त्या जनता दरबारात येत असत.त्यांचे जनता दरबारात अधिकारी चुळबूळ करत नव्हते मात्र नंतरच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे.आता राजकीय नेते स्वार्थविरहित राहिले नाही ही बाब लपून राहिलेली नाही.प्रशासनात त्यांचे हात ओले होत असताना नैतिक अधिकार त्यांनी गमावला असल्याचे दिसून येत आहे.वर्तमानात नेते जनता दरबारात कार्यकर्ते विरोधी गटाचे नागरिक येऊ नये याची व्यवस्था राबवताना दिसून येत असून आधी त्याच्या बातम्या प्रसारित करताना दिसून येत नाही.

     महाराष्ट्र शासनाने राज्यातील सुमारे ३०४ ते ३०५ तालुक्यांमध्ये अधिकृतपणे दुष्काळ जाहीर केला असून,यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्याचाही समावेश आहे.यंदा मान्सूनमधील पावसाची मोठी खेच (१८% तुटवडा) आणि ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान पडलेल्या ३५ ते ४५ दिवसांच्या प्रदीर्घ खंडामुळे राज्यातील खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले असून ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.जिल्ह्यात पावसाअभावी तब्बल ९ लाख ६२ हजार हेक्टर क्षेत्र प्रभावित झाले आहे.यामध्ये जिरायती,बागायती आणि सुमारे ५६ हजार हेक्टरवरील फळबागांचा समावेश आहे.जिल्ह्यातील २०८ हून अधिक गावांना सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला असून उपलब्ध चारा केवळ दीड ते दोन महिनेच पुरेल अशी भीती व्यक्त केली जात आहे.परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने ४७० कोटी रुपयांचा टंचाई आराखडा प्रस्तावित केला आहे. तसेच एकूण १,३६५ कोटी १४ लाख रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे.गेल्या दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या खाती पाच हजारांची (बोळवण केलेली ) रक्कम जमा होत आहे.मात्र यावर शेतकऱ्यांचे समाधान झाले असल्याचे दिसून येत नाही.कोपरगाव तालुक्यातील नैऋत्येकडील तेरा गावांचा टंचाईचा प्रश्न निळवंडे धरण आणि कालव्यांमुळे संपल्यात जमा आहे.तर पूर्वभागातील गावांना पालखेड मुळे टंचाईचे तडाखे कमी झाले आहे.मात्र गोदावरी लाभक्षेत्रात मात्र ही टंचाई जाणवू शकत असल्याचे जाहीर बोलले जाऊ लागले आहे.या कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी कालवे अस्तरीकरणाला आधीच विरोध केला आहे.शिवाय महसूल प्रशासनात कोपरगावतच नव्हे तर राज्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार बोकाळला आहे.त्याला आ.विवेक कोल्हे कसा आवर घालणार हा पहिल्याच बैठकीत औत्सुक्याचा विषय ठरणार आहे.

  माजी स्व.मंत्री शंकरराव कोल्हे यांचे काळात त्याची प्रशासनावर मजबूत पकड होती.त्यामुळे सत्ताधारी कार्यकर्ते येत पण विरोधकच त्या जनता दरबारात येत असत.त्यांचे जनता दरबारात अधिकारी चुळबूळ करत नव्हते मात्र नंतरच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे.आता राजकीय नेते स्वार्थविरहित राहिले नाही ही बाब लपून राहिलेली नाही.प्रशासनात त्यांचे हात ओले होत असताना नैतिक अधिकार त्यांनी गमावला असल्याचे दिसून येत आहे.वर्तमानात नेते जनता दरबारात कार्यकर्ते आणि नागरिक येऊ नये याची व्यवस्था राबवताना दिसून येत असून आधी त्याच्या बातम्या प्रसारित करताना दिसून येत नाही.एवढेच नाही तर कारखान्याची वार्षिक सभा अन्य तालुकास्तरीय सहकारी संस्थांच्या वार्षिक सभा आता जाहीर बातम्या देऊन होत नाही.त्या झाल्यावर त्या बातम्या दिल्या जातात.विरोधक येऊच नये याची व्यवस्था राबवली जाताना दुर्दैवाने दिसून येत आहे.वर्तमानात नेत्यांची नैतिक उंची आता फारच कमी झालेली दिसून येत आहे.

   कोपरगाव तालुक्यात जलजीवन योजनाचा निधी अभावी बोऱ्या वाजला आहे.कोपरगावात पाच क्रमांकाचे तळे होऊनही नागरिकांना दररोज पाणी मिळू शकलेले नाही.जलजीवन योजनेचे ठेकेदार देयके मिळत नसल्याचे आत्महत्या करत आहेत.त्याला कोपरगाव तालुक्यातील योजना अपवाद नाही.कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना अद्याप पुरेशा दाबाने वीज मिळत नाही,जळालेले विद्युत रोहित्र रक्कम मोजल्याशिवाय शेतकऱ्यांच्या दारी येत नाहीत.तालुक्यातील रस्त्यांची बाब तर विचारू नका.तालुक्याची हद्द सुरू झाली की कोपरगाव आले असे प्रवासी समजू लागले आहे.त्यामुळे त्यांच्या तोडून नेत्यांचे शेलक्या विशेषणात स्वागत होत आहे.सावळीविहीर-भरवस फाटा,झगडेफाटा ते वडगाव पान,सावळीविहीर ते कोपरगाव या शिवाय ग्रामीण रस्ते मृत्यूचे सापळे बनले आहेत.दुग्ध व्यवसाय हा महत्वाचा पूरक व्यवसाय बनला आहे.मात्र आता चारा टंचाई हा महत्वाचा विषय बनत आहे.रब्बी पिकांचे व शेतीचे आवर्तन हे पिके उभारण्याच्या वेळी न देता नेहमी प्रमाणे जलसंपदा विभाग वेळ संपून गेल्यावर देण्यात येणार असल्याचे शेतकऱ्यांत संताप आहे.त्यामुळे उद्याच्या जनता दरबाराकडे कोपरगाव तालुक्यातील शेतकरी,ग्रामस्थ,कार्यकर्ते यांचे लक्ष लागून राहिले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close