कोपरगाव तालुका
डॉ.आंबेडकर यांना कोळपेवाडीत अभिवादन
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आ.आशुतोष काळे यांनी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आहे.यावेळी त्यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले आहे.
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.भीमराव रामजी तथा बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ,अर्थशास्त्रज्ञ,राजनीतिज्ञ,तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री,स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री,भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते.त्यांना नुकतेच अभिवादन कोळपेवाडी करण्यात आले आहे.
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.भीमराव रामजी तथा बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ,अर्थशास्त्रज्ञ,राजनीतिज्ञ,तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री,स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री,भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते.त्यांच्या महानिर्वाण दिनानिमित्त त्याना कोपरगाव तालुक्यात कर्मवीर काळे सहकारी कारखाना कार्यस्थळावर अभिवादन करण्यात आले आहे.
या वेळी पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगधने,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,संचालक सूर्यभान कोळपे,राजेंद्र मेहेरखांब, कोपरगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव,समता सैनिक दलाचे जिल्हाप्रमुख के.पी.रोकडे,सुरेगावचे सरपंच शशिकांत वाबळे,पोलीस पाटील संजय वाबळे,राहुल जगधने,ग्रामपंचायत सदस्या सविता लोंढे,रवींद्र देवकर,पत्रकार सिद्धार्थ मेहेरखांब,रमेश निकम,अरुण लोंढे, बाळासाहेब रोकडे,बाबासाहेब रोकडे,राजेंद्र मेहेरखांब, बाळासाहेब मेहरखांब,उत्तम मेहरखांब,राहुल बनकर,बाळू मेहरखांब,रवींद्र डोलारे,उत्तम विघे,भरत मेहरखांब,बुद्धीस्ट फौंडेशन,बौद्ध महासभा व समता सैनिक दलाचे जवान,सदस्य तसेच बौद्ध उपासक,उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.