जाहिरात-9423439946
निवड

कोपरगाव तालुक्यातील…या सहकारी साखर कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांची निवड संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

अ,’नगर जिल्ह्यातील सहकारात अग्रणी असलेल्या कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याची २०२२-२०२७ सालची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली असून एकून २१ उमेदवार बिनविरोध निवडून आले होते.कारखान्याच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीचा कार्यक्रम नुकताच कारखान्याच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी श्रीमती पल्लवी निर्मळ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला असून कारखान्याच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा आ.आशुतोष काळे यांची निवड करण्यात आली असून उपाध्यक्षपदी दिलीप आनंदराव बोरनारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.नूतन पदाधिकऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

“मागील संचालक मंडळाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय घेवून कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने कारखाना विस्तारीकरणाचे काम हाती घेतले असून हे काम युद्धपातळीवर सुरु आहे.त्यामुळे २०२२-२३ चा गळीत हंगाम हा नवीन बॉयलर व नवीन मिलच्या माध्यमातून सुरु होणार आहे”-आ.आशुतोष काळे,नूतन अध्यक्ष,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना.

सहकार निवडणूक प्राधिकरणाने राज्यातील २५ जिल्ह्यांमधील ८९ सहकारी संस्थांच्या निवडणुकीचे आदेश काढले होते.त्यात सोलापूरसह मुंबई,सांगली,सातारा,कोल्हापूर,पुणे,परभणी,जालना,औरंगाबाद,नांदेड,बीड,उस्मानाबाद,लातूर,धुळे,यवतमाळ,बुलढाणा,अकोला, अमरावती,वाशिम,नागपूर,नंदूरबार,अ,नगर,नाशिक या जिल्ह्यांमधील सहकारी संस्थांचा समावेश आहे.त्यात कर्मवीर शंकरराव काळे, सहकारी कारखान्यासह संजीवनी सहकारी साखर कारखाण्याचा ही समावेश होता.
दरम्यान कोरोनामुळे या सहकारी संस्थांची मुदत संपूनही निवडणूक प्रक्रिया घेता आली नव्हती.आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून बहुतेक जिल्हे कोरोनामुक्‍त झाले होते त्यामुळे या निवडणुका जाहीर केल्या होत्या.त्या नुसार कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम २० जून २०२२ पासून सुरू झाला होता.२० जून ते २४ जून या कालावधीत उमेदवारांना आपले नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले होते.या कालावधीत अनेक इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे एकूण १०९ इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
त्या निवडणुकीत सर्व उमेदवार बिनविरोध निवडणून आल्याचा दावा करण्यात आला होंता.आज अध्यक्ष,उपाध्यक्ष यांची निवडणूक निवडणूक अधिकारी पल्लवी निर्मळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली आहे.

सदर प्रसंगी अध्यक्षपदाच्या नावाची सूचना राजेंद्र घुमरे यांनी मांडली त्यास अनिल कदम यांनी अनुमोदन दिले आहे.तसेच उपाध्यक्षपदाच्या नावाची सूचना सूर्यभान कोळपे यांनी मांडली सदर सूचनेला प्रवीण शिंदे यांनी अनुमोदन देवून सर्व संचालकांच्या वतीने अध्यक्षपदी आ.आशुतोष काळे यांची व उपाध्यक्षपदी दिलीप बोरनारे यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती पल्लवी निर्मळ यांनी जाहीर केले आहे.

दरम्यान संजीवनी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक संपन्न झाली असून या निवडणुकीत विवेक कोल्हे यांची तर उपाध्यक्षपदी रमेश घोडेराव यांची निवड झाल्याची माहिती आहे.

निवडीनंतर नवनिर्वाचित अध्यक्ष आ.काळे म्हणाले की,”त्याचबरोबर सभासदांच्या हिताचे निर्णय घेवून जिल्ह्यात ऊसाला एफ.आर.पी.पेक्षा जादा दर देण्याची परंपरा कायम ठेवली आहे.मागील काही वर्षापासून अतिरिक्त ऊसाचा प्रश्न सातत्याने निर्माण होत असल्यामुळे मागील संचालक मंडळाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय घेवून कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने कारखाना विस्तारीकरणाचे काम हाती घेतले असून हे काम युद्धपातळीवर सुरु आहे.त्यामुळे २०२२-२३ चा गळीत हंगाम हा नवीन बॉयलर व नवीन मिलच्या माध्यमातून सुरु होणार आहे.निसर्गाचा लहरीपणा आणि साखर धंद्याविषयी असलेली अनिश्चितता यामुळे साखर उद्योगापुढे अनेक आव्हाने आहेत.परंतु सहकाराची जपवणूक करतांना सभासद हित डोळ्यासमोर ठेवून माजी खा.शंकरराव काळे साहेब यांच्या आशीर्वादाने कारखान्याच्या प्रगतीसाठी माझी बांधिलकी कायम राहील. माझ्यावर पुन्हा एकदा मोठ्या विश्वासाने संचालकांनी आणि सभासदांनी टाकलेली जबाबदारी माजी आ.अशोक काळे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पाडून या कामधेनुच्या प्रगतीसाठी आणि सभासदांच्या हिताचाच विचार होईल अशी ग्वाही दिली आहे.

यावेळी ज्येष्ठ संचालक माजी आ.अशोक काळे यांचेसह नवनिर्वाचित संचालक राजेंद्र घुमरे,सुधाकर रोहोम,वसंतराव आभाळे,सूर्यभान कोळपे,सचिन चांदगुडे,अनिल कदम,श्रीराम राजेभोसले,अशोक मवाळ,शंकरराव चव्हाण,मनोज जगझाप (माळी),शिवाजीराव घुले,सुनील मांजरे,दिनार कुदळे,प्रवीण शिंदे,डॉ.मच्छिंद्रनाथ बर्डे,महिला संचालक वत्सलाबाई सुरेश जाधव,इंदुबाई विष्णू शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान संजीवनी सहकारी साखर कारखनायची निवडणूक संपन्न झाली असून या निवडणुकीत विवेक कोल्हे यांची तर उपाध्यक्षपदी रमेश घोडेराव यांची निवड झाल्याची माहिती आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close