जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांची प्रस्तावित तलावाची पाहणी

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करीत असलेल्या आ.आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून पाच क्रमांकाच्या साठवण तलावाचे प्राथमिक स्वरूपातील खोदकाम पूर्ण झाले आहे.यापुढील कामासाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी त्यांचे प्रयत्न आहे.त्यासाठी तलावाचे पुढील कामाचे अंदाजपत्रक तातडीने तयार करावे अशा सूचना त्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.त्या सूचनेवरून सबंधित अधिकाऱ्यांनी नुकतीच या साठवण तलावाची पाहणी केली आहे.

कोपरगाव साठवण तलावाचा प्रश्न विधानसभा निवडणुकीपूर्वी अहंम बनला होता.त्यावरच सर्व राजकारण रंगले होते.अनेकांनी निळवंडेच्या प्रश्नाचे भांडवल करून जनतेची दिशाभूल केली होती.मात्र आ.आशुतोष काळे यांनी मात्र वस्तुस्थितीला धरून साठवण तलाव क्रमांक पाचचा प्रश्न लावून वास्तवाशी जुळवून घेतले होते.त्याचा सध्या पाठपुरावा सुरु आहे.

कोपरगाव शहराच्या नागरिकांना विधानसभा निवडणुकीपूर्वी पाच क्रमांकाच्या साठवण तलावाचे काम मार्गी लावण्याचे दिलेल्या वचनाची वचनपूर्ती निवडून आल्यानंतर तीनच महिन्यात करून प्राथमिक स्वरूपातील खोदाई काम पूर्ण केले आहे.यापुढील काम लवकरात लवकर सुरु करून पाणी प्रश्न कायमचा निकाली काढण्याचा आ.काळे यांचा मानस असून त्यासाठी त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु असून त्या पाठपुराव्यातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे शाखा अभियंता प्रशांत कदम,उपअभियंता विवेक शेठे,सहाय्यक अभियंता मुकेश धकाते यांनी पुढील कामाचे अंदाजपत्रक तयार करण्यासाठी मंगळवार (दि.८) रोजी समक्ष येवून या साठवण तलावाची पाहणी केली आहे.

यावेळी नगराध्यक्ष विजय वहाडणे,राष्ट्रवादी काँग्रेस कोपरगावचे शहराध्यक्ष सुनील गंगूले,संतोष चवंडके,नगरसेवक गटनेते वीरेन बिरावके,मंदार पहाडे,राजेंद्र वाकचौरे,अजीज शेख,गौतम सहकारी बँकेचे संचालक सुनील शिलेदार,महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा,युवकअध्यक्ष नवाज कुरेशी,रमेश गवळी,कृष्णा आढाव,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,नगर अभियंता दिगंबर वाघ,पाणीपुरवठा अभियंता ऋतुजा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.या साठवण तलावाचे कामाला गती मिळत असल्यामुळे शहरातील नागरिकांनीं समाधान व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close