जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात मुखपट्या बांधा अन्यथा कारवाई अटळ-इशारा

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यात व शहरात पुन्हा एकदा कोरोना रुग्ण मोठया प्रमाणात वाढत असल्याने नागरिकानी आपल्या सवयी बदलाव्या व आपल्या तोंडाला मुखपट्या सक्तीने बांधाव्या अन्यथा पोलिसांनी आपली कारवाई कडक करावी असे आवाहन कोपरगाव येथे एका बैठकीत आ.आशुतोष काळे यांनी नुकतेच केले आहे.

यावेळी शाळा सुरु केल्याने प्रशासन व नेते,कार्यकर्ते व नागरिकांच्या चेहऱ्यांवरील चिंता लपून राहिली नाही.त्यामुळे आगामी काळात दिल्ली सरकारने जी दंडाची रक्कम दोन हजार रुपयांपर्यंत केली आहे.त्याची कोपरगाव शहर व तालुक्यातही करण्याची गरज निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या ०२ हजार ३१२ इतकी झाली आहे.त्यात ७० रुग्ण सक्रिय आहेत,तर आज पर्यंत ३८ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.आजपर्यंत कोपरगाव तालुक्याचा मृत्युदर १.६४ टक्के आहे.आतापर्यंत १५ हजार १८० जणांचे श्राव तपासले आहेत यातून बाधित रुग्णांचा दहा लाखाला ६० हजार ७२० इतका आढळला आहे.तर बाधित रुग्ण दर १५.२३ असा आढळला आहे तर आतापर्यंत कोरोनातून उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णाची संख्या ०२ हजार २०४ इतकी झाली आहे.टक्केवारीत हा दर ९५.३२ टक्के झाला आहे.या पार्श्वभूमीवर कोपरगाव तहसील कार्यालयात कोरोना साथीवर प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी कोपरगाव पंचायत समितीच्या सभापती पौर्णिमा जगधने,उपसभापती अर्जुन काळे,तहसीलदार योगेश चन्द्रे,कर्मवीर काळे कारखान्याचे उपाध्यक्ष रोहोम,माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे,मंगेश पाटील,राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,कर्मवीर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष कारभारी आगवन,कोपरगाव पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक भारत नागरे,तालुका पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सचिन इंगळे,कोपरगाव ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा फुलसौन्दर,तालुका वैद्यकीय अधिकारी दि.संतोष विधाते,माजी सभापती मधुकर टेके,रोहिदास होन,नगरसेवक मंदार पहाडे,मेहमूद सय्यद,युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष चारुदत्त सिनगर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी खाजगी रुग्णालयात उपचार करताना जास्त शुल्क आकारले जाते असा आरोप काही नागरिकांनी केला होता.तर माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे यांनी सरकारी शाळातील विद्यार्थ्यांचा आर्थिक स्तर किमान असल्याने त्यांची आधी कोरोना तपासणी करण्यात यावी अशी मागणी केली होती.तर संदीप वर्पे, अर्जुन काळे,आदींनी यावेळी समस्या मांडल्या तर पोलिस उपनिरीक्षक भारत नागरे यांनी या वेळी सरकारने दंडाची रक्कम कमी केल्याने नागरिक ती सहजासहजी देऊन पसार होता आहे.त्याना मुखपट्टी बांधण्याची गरज वाटत नाही अशी हताशता व्यक्त केली आहे.त्यावेळी काही नागरिकांनी दंडाची रक्कम पाचशे रुपयांपर्यंत वाढविण्याची मागणी केली असता तहसीलदार चंद्रे यांनी सरकारने हि रक्कम निर्धारित केली असल्याने वाढवता येणार नसल्याचा खुलासा केला आहे.त्यामुळे या पुढील काळात नागरिक मुखपट्यांची सक्ती काहीशी ढिली झाल्याने नागरिकांना रान मोकळे झाला असल्याने या पुढील काळात कोरोना रुऊग्न वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.यावेळी चर्चेत डॉ.कृष्णा फुलसौन्दर ,डॉ,संतोष विधाते,डॉ.बडदे आदींनी चर्चेत सहभाग घेतला आहे.

यावेळी शाळा सुरु केल्याने प्रशासन व नेते,कार्यकर्ते व नागरिकांच्या चेहऱ्यांवरील चिंता लपून राहिली नाही.त्यामुळे आगामी काळात दिल्ली सरकारने जी दंडाची रक्कम दोन हजार रुपयांपर्यंत केली आहे.त्याची कोपरगाव शहर व तालुक्यातही करण्याची गरज निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close