गुन्हे विषयक
पुणतांबा चौफुलीवर दोघांना मारहाण,गुन्हा दाखल
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहराच्या दक्षिणेस साधारण दोन कि.मी.अंतरावर असलेल्या नगर-मनमाड मार्गावरील पुणतांबा फाटा चौफुलीवर आरोपी राहुल सोमनाथ नागरे कोपरगाव,व अरुण गंगावणे दोघे रा.मोहिनीराजनगर या दोघांसह अन्य एकाने आपल्याला रविवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास कामावरून घरी जात असताना संगनमत करून लाथा बुक्यांनी व लाकडी दांडक्याने मारहाण केली असल्याची फिर्याद श्रावण रामविलन कोहोरी रा.सांगळे वस्ती पुणतांबा फाटा कोपरगाव यांनी शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.त्यामुळे कोपरगाव परिसरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान या घटनेत मारणारे आरोपी हे अन्य असून फिर्यादीने तशा दिसणाऱ्या मात्र दुसऱ्याच आरोपींना या गुन्हयात गोवले असल्याची माहिती नागरिकांत बोलली जात आहे.यातील एक आरोपी अटक आहे,तर दोन जण फरार असल्याची माहिती आहे.त्यामुळे या प्रकारणी उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी हे कोपरगाव नजीक असलेल्या पुणतांबा चौफुलीजवळ रहिवाशी आहे.ते आपल्या कर्तव्यावरून घरी जात असताना रविवार दि.२२ नोव्हेम्बर रोजी रात्री १०.५० वाजता आपल्याला वरील तीन आरोपींनी रस्त्यावर उभे असताना आपल्याला अडवून लाथाबुक्यांनी व लाकडी दांडक्याने मारहाण केली आहे.आपल्याला या मारहाणीत आपल्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.या प्रकरणी त्यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान यातील एक आरोपी अटक आहे तर दोन जण फरार आहे.
कोपरगाव शहर पोलिसानी या प्रकरणी गु.र.क्रं.८१७/२०२० भा.द.वि.कलम ३२४,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.पी.पुंड हे करीत आहेत.दरम्यान या घटनेत मारणारे आरोपी हे अन्य असून फिर्यादीने तशा दिसणाऱ्या मात्र दुसऱ्याच आरोपींना या गुन्हयात गोवले असल्याची माहिती नागरिकांत बोलली जात आहे.यातील एक आरोपी अटक आहे,तर दोन जण फरार असल्याची माहिती आहे.त्यामुळे या प्रकारणी उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे.