जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

शिर्डीतील त्या गुंह्यातील सर्व आरोपी जेरबंद !

जाहिरात-9423439946
जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)
राहाता तालुक्यातील शिर्डी नजीक हाकेच्या अंतरावर असलेल्या निमगाव ग्रामपंचायत हद्दीत देशमुख चारी शेजारी राहणाऱ्या आरोपी अजय वैजनाथ भांगे,विशाल रमेश पाटील,रवींद्र बनसोडे,यांचे विरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचा राग मनात धरून वरील आरोपींसह अकरा जणांनी रवींद्र साहेबराव माळी रा.सदर यांनी साई श्रद्धा किराणा स्टोअर समोर मयताच्या यांच्या मानेवर चाकूने वार करून खून केल्याची घटनेतील आठ आरोपींना राहाता येथील न्यायालयात शिर्डी पोलिसानी हजर केले असता त्यांना न्यायालयाने नुकतीच चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे तर यातील दोन आरोपी हे अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी नगर येथील बाल सुधारगृहात करण्यात आल्याची माहिती शिर्डी उपविभागीय पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी संजय सातव यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये आज सायंकाळी दिली आहे.

यातील आरोपी हे सराईत असून त्यांच्यातील अजय भांगे याचे विरुद्ध तीन गंभीर गुन्हे,तर कुणाल जगताप याचे विरुद्ध दोन गंभीर गुन्हे,समीर शेख याचे विरुद्ध तीन गंभीर गुन्हे,ललिता रमेश पाटील हिच्या विरुद्ध तीन गंभीर गुन्हे, तर अज्जु पठाण उर्फ सद्दाम राणा याचे विरुद्ध तब्बल पाच गंभिर गुन्हे दाखल आहे-संजय सातव,शिर्डी उपविभागिय पोलीस अधिकारी.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,राहाता तालुक्यातील निमगाव ग्रामपंचायत हद्दीत डॉ.देशमुख हॉस्पिटल जवळ मयत रवींद्र साहेबराव माळी हा रहिवाशी होता.मात्र त्यांचे व आरोपी यांचे काही कारणावरून भांडण झाले होते.त्यामुळे मयत रवींद्र माळी याने शिर्डी पोलीस ठाण्यात या बाबत गुन्हा दाखल केला होता.याचा त्याच परिसरातील रहिवाशी असलेले आरोपींच्या मनात राग होता.त्यांनी एकत्र जमून फिर्यादीचे वडील रवींद्र माळी यांना आरोपी विशाल रमेश पाटील,रा.चांगदेवनगर निमगाव,रवींद्र बनसोडे,रा.जोशी शाळा,समीर शेख रा.राहाता,यांनी धक्काबुक्की करून धरून ठेवले व अन्य आरोपी अज्जू पठाण रा.निमगाव,रंजना वैजनाथ भांगे,ललिता रमेश पाटील दोघी रा.निंमगाव,सुनील लोखंडे,अक्षय शिंदे,महेश गायकवाड,कुणाल जगताप,अजय वैजनाथ भांगे,यांनी त्यांच्या हातातील धारदार चाकूने मयत रवींद्र माळी याचे मानेवर जोराने वार करून दुखापत करून दि.१९ ऑक्टोबरच्या रात्री १०.३० वाजता खून केला होता.

या प्रकरणी फिर्यादी रोहित रवींद्र माळी (वय-१६) मयताचा मुलगा याने शिर्डी पोलीस ठाण्यात आरोपी अजय वैजनाथ भांगे,विशाल रमेश पाटील,रवींद्र बनसोडे,समीर शेख,राजू पठाण,रंजना वैजनाथ भांगे,ललिता रमेश पाटील,सुनील लोखंडे,अक्षय शिंदे,महेश गायकवाड,कुणाल जगताप,सर्व अकरा आरोपी सर्व रा.निमगाव यांचे विरुद्ध शिर्डी पोलिसांत गुन्हा दाखल केला होता.

या प्रकरणी शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव,पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांनी घटनास्थळी भेट दिली होती.व आरोपी रंजना भांगे,ललिता पाटील,सुनील लोखंडे,अक्षय शिंदे,महेश गायकवाड आदी दहा आरोपीना अटक केल्याचा दावा केला होता.या सर्वांना नुकतेच राहाता न्यायालयापुढे पोलिसानी हजर केले असता न्यायालयाने त्यातील आठ जणांना दि.२४ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती तर दोघांना ते विधिग्रत (अल्पवयीन) असल्याने त्यांना बाल सुधार ग्रुहात रवानगी करण्यात आली होती.या घटनेने राहाता तालुक्यात खळबळ उडाली होती.व नुकतेच शिर्डी साईबाबा मंदिर उघडले असताना हि धक्कादायक घटना घडल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली होती. या ठिकाणी पोलीस उपविभागीय पदी संजय सातव व पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांची नियुक्ती झाली असतांना त्यांच्या पुढे या तपासाचे आव्हान निर्माण झाले असले तरी त्यांनी दहा आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहे.तर या गुंह्यातील एक जण फरार असल्याचा दावा केला असताना आज पुन्हा पत्रकार परिषद घेऊन हा दावा केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

दरम्यान यातील आरोपी हे सराईत असून त्यांच्यातील अजय भांगे याचे विरुद्ध तीन गंभीर गुन्हे,तर कुणाल जगताप याचे विरुद्ध दोन गंभीर गुन्हे,समीर शेख याचे विरुद्ध तीन गंभीर गुन्हे,ललिता रमेश पाटील हिच्या विरुद्ध तीन गंभीर गुन्हे, तर अज्जु पठाण उर्फ सद्दाम राणा याचे विरुद्ध तब्बल पाच गंभिर गुन्हे दाखल असल्याची माहिती उपविभागिय पोलीस अधिकारी संजय सातव यांनी दिली आहे.मुख्य आरोपी अजय भांगे व रवी भांगे यास नाशिक येथून ताब्यात घेतला आहे.सद्दाम राणा यास राहाता येथून ताब्यात घेतले आहे.गुन्हा घडल्यापासून आरोपींना चोवीस तसाच्या आत ताब्यात घेतल्याचा दावा पोलिसानी केला आहे.

दरम्यान या गुंह्यातील आरोपी हे पाप्या शेख या कुप्रसिद्ध टोळीशी संबंधित असून हि टोळी अद्यापही कार्यरत असून ती नेस्तनाबूत झालेली नसल्याचे उघड झाले आहे.पाप्या हा सध्या संघटित गुन्हेगारी प्रतिबंधात्मक कायद्याखाली (मोक्का) अटक असला तरी हि टोळी अद्याप त्याच्याशी संबंधित महिला ललिता पाटील हि टोळी चालवत असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.पाप्याच्या टोळीने सन-२०११च्या वट पौर्णिमेच्या दिवशी पहाटेला रचित पाटणी व प्रवीण गोंदकर या दोन तरुणांची हत्या करून त्यांना शिर्डीतील भर चौकात आणून टाकण्याचे धाडस केले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close