कोपरगाव तालुका
अतिरिक्त अशैक्षणिक कामांचा भार नको-न.पा.शिक्षकांचा बहिष्कार !

जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोरोनाच्या संकटामुळे वर्ग अध्यापन सुरू नसल्याने शिक्षकांवर विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन तसेच ऑफलाईन शिक्षणाची आधीच जबाबदारी आहे.त्यातच मतदार यादी पुर्ननिरीक्षणाचे कामाचा भुंगा पाठीशी लावून दिला असताना खावटी अनुदान योजने अंतर्गत नगरपालिका शिक्षकांना अशैक्षणिक कामांच्या सूचना देण्यात आल्याने नगरपरिषद शिक्षकांचा कडेलोट झाला असून या आदेशांतर्गत निर्देशित कामावर एकमुखी बहिष्कार टाकला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
सहाय्यक प्रकल्पाधिकारी,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,राजूर यांनी खावटी अनुदान योजने अंतर्गत कोपरगाव नगरपालिकेला आदेश निर्गमित केला आहे.या आदेशानुसार कोपरगाव नगरपालिकेने अखत्यारितील शिक्षकांना कामाचे आदेश जारी केले आहेत.त्यानुसार शिक्षकांवर अशैक्षणिक कामांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.वर्तमानात मतदार यादी पुर्ननिरीक्षण तसेच ऑनलाईन आणि ऑफलाईन अध्ययनाचे काम सुरू आहे.अशा परिस्थितीत शिक्षकांना अतिरिक्त शैक्षणिक कामे देण्यात येऊ नये अशी मागणी या शिक्षकांची आहे.कोपरगाव नगरपालिकेच्या आदेशावर बहिष्कार घालत असल्याचे सह्यानिशी नगरपालिका प्रशासनाला सादर केलेल्या निवेदनातं त्यांनी शेवटी म्हटले आहे.यावेळी भरत आगळे,अरुण पगारे,सुनील रहाणे,प्रशांत शिंदे,विलास माळी यांच्यासह शिक्षक-शिक्षिका बहुसंख्येने उपस्थित होते.