कामगार जगत
..या साखर कारखान्याच्या सेवानिवृत्त कामगारांचे पुण्यात आंदोलन !
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
डॉ.पद्मश्री विखे पाटील कारखाना युनिट-२ मधील सेवानिवृत्त कामगारांची सेवा निवृत्तीची रक्कम व ५२ महिन्यांचे थकित पगार तातडीने मिळावे यासाठी पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयात दि.१८ नोव्हेंबर रोजी या कारखान्यातील इतर सेवानिवृत्त साखर कामगार व डॉ.विखे पाटील साखर कारखाना गणेश युनिट-२ चे कामगार उपोषणासाठी बसणार असल्याची माहिती उपलब्ध झाल्याने कारखाना प्रशासनात खळबळ उडाली आहे.
आमच्या हक्काची सेवानिवृत्तीची रक्कम व कामगार न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे तीस दिवसात कारखाना व्यवस्थापनाने तत्काळ अदा करावी अन्यथा अठरा टक्के दर व्याजाप्रमाणे ती आम्हास मिळावी अशी मागणी केली होती. या प्रमुख मागण्यांसाठी अंदाजे तीन ते पाच वर्षे झालेले आहे मात्र नाठाळ कारखाना प्रशासन व त्यांचे नेते त्याकडे दुर्लक्ष करून असंवेदनांचे प्रदर्शन करत आहे हि निषेधार्ह बाब आहे-रमेश देशमुख कामगार नेते.
या प्रसंगी रमेश देशमुख बोलतांना म्हणाले की,”या प्रश्ना संदर्भात दि.२० ऑक्टोबर रोजी अहमदनगर येथील प्रादेशिक सहसंचालक यांच्या कार्यालयात आंदोलन कर्ते व सर्व सेवानिवृत्त कर्मचारी सुनावणीसाठी गेले होते.व त्यांनी आमच्या हक्काची सेवानिवृत्तीची रक्कम व कामगार न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे तीस दिवसात कारखाना व्यवस्थापनाने तत्काळ अदा करावी अन्यथा अठरा टक्के दर व्याजाप्रमाणे ती आम्हास मिळावी अशी मागणी केली होती. या प्रमुख मागण्यांसाठी अंदाजे तीन ते पाच वर्षे झालेले आहेत.वेळोवेळी लिखित व तोंडी स्वरुपात संबंधितांकडे या संदर्भात लेखी मागणी केलेली आहे.परंतु अद्याप पर्यंत त्याची पूर्तता झालेली नाही.कारखाना नेतृत्व आणि प्रशासन यांनी आपले कान व डोळे बंद करून या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.या कारखान्यातील सेवानिवृत्त कर्मचार्यांना पगार व सेवानिवृत्ती रक्कम न मिळाल्याने त्यांच्या आजारपणाच्या काळात ते औषधोपचार देखील करु शकत नाहीत. यामुळे अनेकजण मयत झालेले आहेत.अनेकांना जीर्ण आजारांनी त्रस्त झालेले आहे.त्यामुळे त्यांच्या कुटूंबियांचे हाल सुरु असून,उदरनिर्वाह करणे देखील अवघड झालेले आहेत. यामुळे यासर्व बाबींचा संबंधितांनी योग्य तो विचार करुन तातडीने या सर्व मागण्या मान्य कराव्यात,असे आवाहन डॉ.विखे पाटील सारखा कारखाना गणेश युनिट-२ च्या साखर कामगारांनी केले आहे.
या संदर्भात साखर आयुक्त पुणे यांनी श्री गणेश कारखाना यांना दिनांक २६ मे रोजी २०१४ पासून देणी रक्कम रु.८७ कोटी लिखित स्वरुपात स्विकारलेली असताना सुद्धा ती अद्यापर्यंत कामगारांपर्यंत पोहचलेली नाही.यामुळे अनेक कामगारांची हालअपेष्टा सुरु असल्याची माहिती सेवानिवृत्त कामगार नेते रमेश देशमुख,सुभाष सांबारे,नारायण भुजबळ,कारभारी घोगळ, रामराव जाधव,गिताराम शेलार,अरुण तुपे आदी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.व वेळेत हि देणी दिली नाही तर आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा दिला आहे.कामगारांचे हे आर्थिक शोषण सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी असून या बाबत गणेश सहकारी कारखान्याच्या कामगारातही अस्वस्थता असल्याचे दिसून आले आहे.