जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

..या शहराच्या नवीन साठवण तलावासाठी निधी मिळणार !

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहराचा पाणीप्रश्न मिटविण्यासाठी भविष्यात महत्वाची भूमिका पार पाडणाऱ्या नव्या पाच नंबर साठवण तलावाच्या पुढील कामासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्याला मंजुरी मिळावी.याबाबत आ.आशुतोष काळे यांची नुकतीच नगरविकास राज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे यांचेसोबत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती दिली आहे.

कोपरगाव शहरातील उच्चदाब व लघुदाब वीज वाहिन्या भूमिगत करण्यासाठी ५५ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर झालेला असून त्याबाबत कोणतेही काम पूर्ण झालेले नाहीत.त्याची चौकशी करून कार्यवाही करावी.मतदार संघात नवीन कृषीपंप कनेक्शन बाबत एकूण १५७० शेती पंपाचे नवीन अर्ज प्रलंबित असून त्या ग्राहकांना तातडीने कनेक्शन मिळावे-आ.आशुतोष काळे

कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न दरवर्षी उन्हाळ्यात गंभीर होतो.हा प्रश्न सोडविण्यासाठी पाच क्रमांकाचा तलाव निर्णायक भूमिका निभावू शकतो यासाठी आ.काळे यांनी नुकतीच नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची भेट घेतली आहे.यावेळी त्यांनी हे आश्वासन दिले आहे.
सदर प्रसंगी पाणीपुरवठा राज्यमंत्री ना.संजय बनसोडे तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक पार पडली या बैठकीत कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या विविध विकासकामांच्या विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.

त्यावे वेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”आपण या तलावासाठी खात्याकडून निधी व कोपरगाव शहराच्या हद्दवाढ झालेल्या भागाला पाणी पुरवठा करण्यासाठी वाढीव पाईपलाईन योजनेला निधी उपलब्ध करून दिला जाईल.कोपरगाव शहराच्या पाच नंबर साठवण तलावासह मतदार संघातील ऊर्जा,नगरविकास व पाणी पुरवठा खात्याच्या विविध विकास कामांच्या प्रश्नांबाबत त्यांनी चर्चा केली आहे.यामध्ये कोपरगाव विधानसभा मतदार संघात अनेक गावांमध्ये सरकारी जागा उपलब्ध असून या जागेवर सोलर पॉवर प्लांट उभारून घरगुती व शेती पंपासाठी वीज उपलब्ध करून द्यावी.ओव्हरलोड रोहीत्रांची संख्या मोठ्या प्रमाणात असून सदरच्या रोहित्रावर असलेला अतिरिक्त भार कमी करण्यासाठी नवीन रोहित्र मिळावे. जल जीवन योजनेसाठी घातलेली १० टक्के लोकवर्गणीची अट रद्द करावी.तसेच धारणगाव पाणी पुरवठा योजना पुनर्जीवित करून रांजणगाव देशमुख पाणी पुरवठा योजनेसाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आ. काळे यांनी शेवटी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close