आरोग्य
..या गावाची कोरोना मुक्तीकडे वाटचाल !

जनशक्ती न्यूजसेवा
कुंभारी-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कुंभारी ग्रामपंचायत हद्दीत नुकतीच कोपरगाव तालुका आरोग्य विभागाच्या वतीने “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” या राज्य शासनाच्या कोविड तपासणी शिबिराचे आयोजन केले होते त्याला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे.व ८२ ग्रामस्थांनी सहभाग नोंदवला आहे.त्यात सर्वजण निरंक आले आहे.
कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात येत्या १५ सप्टेंबर पासून ‘माझे कुटुंब,माझी जबाबदारी’ ही जनजागृती मोहीम दोन टप्प्यात राबविण्यात येत आहे. या जनजागृती मोहिमेला लोकप्रतिनिधी,सर्व महानगरपालिका,नगरपालिका,नगरपंचायत,ग्रामपंचायत,गावोगावच्या दक्षता समित्या,स्वयंसेवी संस्थांनी मोहिमेत सहभागी होणे अभिप्रेत होणे गरजेचे आहे.
या मोहिमेचा पहिला टप्पा १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबरपर्यंत आणि दुसरा टप्पा १२ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर असा संपन्न होत आहे.यामध्ये घरोघरी जाऊन आरोग्य विषयक चौकशी केली जाणार आहे.यात दोन कर्मचाऱ्यांचे-वयंसेवकांचे एक पथक असेल.हे पथक एका दिवसात ५० घरांना भेटी देईल.या पथकामध्ये एक शासकीय कर्मचारी,आशा सेविका आणि दोन स्थानिक स्वयंसेवक यांचा समावेश आहे.ही मोहीम सार्वजनिक आरोग्य,नगरविकास विभाग,ग्रामविकास विभाग,महिला व बालकल्याण विभाग यांच्या मार्फत राबविण्यात येत आहे आणि महानगरपालिका,नगरपालिकांमध्ये,नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र,प्राथमिक आरोग्य केंद्र याचे नियोजन करत आहे.कुंभारी ग्रामपंचायत हद्दीत कोळपेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र हि तपासणी मोहीम राबवित आहे.त्याचा शुभारंभ नुकताच सरपंच प्रशांत घुले यांच्या हस्ते करण्यात आला आहे.
या कार्यासाठी प्रामुख्याने सभापती पौर्णिमा जगधने उपसभापती अर्जुन काळें,सरपंच प्रशांत घुले,उपसरपंच दिगंबर बडे,डॉक्टर मानसी कापरे,ग्रामसेवक एस. जे.कासवे,पोलीस पाटील उल्हास मेढे,एच.डी. खरे,दत्तात्रय आहेर,आशा सेविका मनीषा पवार,शिंदे ताई,कृषी सहाय्यक निलेश बिबवे,वसंत घुले आदींनी या उपक्रमात सहभाग नोंदवला आहे.८२ जणांनी आपली तपासणी केली आहे.
आज गावोगाव कोरोणाचा संसर्ग वाढत असताना गावच्या कुंभारी ग्रामस्तरीय समितीने कोविंड रॅपिड टेस्ट साठी पुढाकार घेतला गावामध्ये संशयी किंवा जनसंपर्क या सर्वांची तपासणी करून घेण्यात आली आहे. तसेच गावामध्ये ग्रामपंचायत समितीच्या वतीने चौथ्यांदा संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी सोडियम क्लोराइड या औषधाची फवारणी करण्यात आली आहे.वैद्यकीय अधिकारी टाकळी अंतर्गत उपकेंद्र कुंभारी यांच्यावतीने “माझी कुटुंब,माझी जबाबदारी” अभियानात सर्व ग्रामस्थांची तपासणीचा दुसरा टप्पा पूर्ण केला आहे.तसेच सर्व उपक्रमात ग्रामपंचायतीने उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे.गावांमध्ये या सर्व उपक्रमांत बद्दल मोठ्या प्रमाणात जनजागृती व शिवार फेरी काढण्यात आली. या सर्व सहभागी अधिकारी कर्मचारी व बंधू-भगिनी ज्येष्ठ नागरिक ग्रामस्थ यांचे सरपंच प्रशांतजी घुले यांनी आभार मानले आहे. व मुखपट्या वापर,प्रतिबंधात्मक औषधांचा वापर व सुरक्षित शारीरिक अंतर अशा सर्व उपक्रमांमध्ये ग्रामस्थांनी असाच सहभाग ठेवला तर आपण निश्चित कोरणा मुक्त ठेऊ शकू असे प्रतिपादन केले आहे.