कोपरगाव तालुका
ग्रामसेवक वेतन त्रुटीबाबत आ.काळे यांना निवेदन
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्याचे आ.आशुतोष काळे यांना ग्रामसेवक वेतन त्रुटी बाबत निवेदन देण्यात आले तसेच सविस्तर चर्चा करण्यात आली.पुढील आठवड्यात अहमदनगर जिल्ह्याचे पालक मंत्री तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ याच्याशी सविस्तर चर्चा करणे बाबत आश्वासित करण्यात आले आहे.
पाचव्या वेतन आयोगातील त्रुटी लक्षात घेता ती वेतन त्रुटी दूर करणे आवश्यक आहे.कृषी सहाय्यक यांचीच वेतनश्रेणी देणे आवश्यक असताना ती टाळण्यात येत आहे.त्यात तफावत ठेवण्यात येत आहे.याकडे लक्ष वेधण्यात येत आहे.त्यामुळे सहाव्या वेतन आयोगात ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांचे नुकसान झाले आहे-सुनील राजपूत,अध्यक्ष,पदवीधर ग्रामसेवक संघटना
शासनाच्या योजनांची ग्रामीण भागात प्रभावी अंमलबजावणी करण्यात सिंहाचा वाटा असलेल्या ग्रामसेवक संवर्गाच्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकार गांभीर्य दाखवत नसल्याने या संवर्गात मोठा असंतोष निर्माण झाला आहे.विविध मागण्यांबाबत वेळोवेळी झालेल्या चर्चा,बैठकांत देण्यात आलेल्या आश्वासनांची अद्याप पूर्तता झालेली नाही.त्यामुळे याबाबत तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा राज्यातील ग्रामसेवक शासनाचे लक्ष वेधण्यासाठी लोकशाही मार्गाने विविध प्रकारचे आंदोलने विविध ठिकाणी सुरु आहेत.पाचव्या वेतन आयोगातील त्रुटी लक्षात घेता ती वेतन त्रुटी दूर करणे आवश्यक आहे.कृषी सहाय्यक यांचीच वेतनश्रेणी देणे आवश्यक असताना ती टाळण्यात येत आहे.त्यात तफावत ठेवण्यात येत आहे.याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.त्यामुळे सहाव्या वेतन आयोगात ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांचे नुकसान झाले आहे.सात वर्षा ऐवजी बारा वर्षानंतर देण्यात येणारी पदोन्नती अन्यायकारी असल्याचे त्यांनी निदर्शनात आणून देऊन ग्रामसेवकांवरील अन्याय दूर करण्याची मागणी केली आहे.सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी दूर करण्याबाबत या बाबत उच्च न्यायालयाने आदेश देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.या बाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.या मागण्या लवकरच मंजूर कराव्या असेही त्यांनी आपल्या निवेदनात शेवटी म्हटले आहे.याबाबत आ.काळे यांनी ग्रामविकास मंत्र्यांचे लक्ष वेधून या समस्या दूर करण्याचे आश्वासन आ.काळे यांनी दिले आहे.
यावेळी निवेदन देताना महाराष्ट्र राज्य कृषी पदवीधर तांत्रिक ग्रामसेवक संघटना शाखा कोपरगाव तालुका अध्यक्ष सुनिल राजपूत व तालुका सचिवप्रदीप कोल्हे,चंदन गोसावी,योगेश देशमुख,कृष्णा अहिरे,चंद्रकांत अहिरे,किरण राठोड आदी मान्यवर ग्रामसेवक उपस्थित होते.