कोपरगाव तालुका
कोपरगावात अल्पवयीन मुलीचा विनयभंग
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील गजानननगर या उपनगरातील नजीकच्या शाळेत शालांत वर्गात शिकत असलेली अल्पवयीन मुलगी (वय-१५) हीचा गांधीनगर येथील आरोपी तरुण नकुल धर्मराज ठाकरे याने काल सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घरात अन्य कोणी नाही हि संधी साधत घरात घुसून विनयभंग केला असल्याचा गुन्हा कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.
काल दि.०५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास तिच्या घरी कोणी नाही.हि संधी साधून आरोपी तरुण नकुल ठाकरे याने या अल्पवयीन मुलीच्या घरात अनाधिकाराने प्रवेश करून तिच्याशी लगट करून मला तुझ्याशी बोलायचे आहे.असे सांगून तिचा हात धरून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले आहे.तिने या बाबत नाखुशी जाहीर केली असता तिला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी अल्पवयीन मुलगी हि गजानन नगर येथे आपल्या घरी आई,वडील,यांच्या समवेत राहते.आरोपी तरुण व तिची ओळख आहे.काल दि.०५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास तिच्या घरी कोणी नाही.हि संधी साधून आरोपी तरुण नकुल ठाकरे याने या अल्पवयीन मुलीच्या घरात अनाधिकाराने प्रवेश करून तिच्याशी लगट करून मला तुझ्याशी बोलायचे आहे.असे सांगून तिचा हात धरून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले आहे.तिने या बाबत नाखुशी जाहीर केली असता तिला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.या बाबत तिचे काका घरी आले असताना तिने हा सर्व प्रकार त्यांच्या लक्षात आणून देत या बाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात आज दुपारी सव्वा तिच्या सुमारास गुन्हा दाखल केला आहे.
कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.७४८/२०२० भा.द.वि.कलम ३५४,३५४(अ)५०४,५०६,पोस्को कायदा कलम ८,१२ अन्वये आरोपी नकुल ठाकरे याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक भारत नागरे हे करीत आहेत.या घटनेने गजानननगर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.