कृषी विभाग
राहाता बाजार समितीच्या उपसभापती पदी जपे

जनशक्ती न्यूजसेवा
सावळीविहीर-(प्रतिनिधी)
राहाता तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भाऊसाहेब जेजुरकर व सावळीविहीर येथील बाळासाहेब जनार्धन जपे यांची उपसभापती म्हणून नुकतीच निवड करण्यात आली आहे .या निवडीबद्दल राहाता तालुकातुन त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
“आमच्यावर आ. विखे व सर्व संचालक यांनी ही जी जबाबदारी टाकली, ती आम्ही योग्य रीतीने व विश्वासाने पार पाडू व शेतकऱ्यांच्या हिताचे व कामगारांचे हित सांभाळून शेतकऱ्यांचा विश्वास सार्थ करू”-उपसभापती बाळासाहेब जपे,राहाता कृषी उत्पन्न बाजार समिती
राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात ही निवड करण्यात आली आहे.राहाता तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सन,२००४ला स्थापन झाल्यानंतर काही वर्षातच संपूर्ण राज्यात या कृषी उत्पन्न बाजार समितीने मोठी भरारी घेतली आहे. अहमदनगर जिल्ह्यात राहाता कृषी उत्पन्न बाजार समिती एक नावाजलेली कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून गणली जाते.अशा या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आज सोमवार दिनांक ०५ ऑक्टोबर रोजी सर्व संचालक मंडळांची सभा आ.राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत राहाता येथील कार्यालयात संपन्न झाली.या वेळी राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतीपदी भाऊसाहेब जेजुरकर तर सावळीविहीर येथील जेष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब जनार्दन जपे यांची उपसभापती म्हणून निवड करण्यात आली आहे. एकमताने ही निवड झाली आहे. ही निवड झाल्यानंतर आमदार राधाकृष्ण विखे यांनी चेअरमन भाऊसाहेब जेजुरकर व उपसभापती बाळासाहेब जपे यांचा पुष्पहार घालून सत्कार केला.
यावेळी उपसभापती बाळासाहेब जपे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की,”आमच्यावर आ. विखे व सर्व संचालक यांनी ही जी जबाबदारी टाकली, ती आम्ही योग्य रीतीने व विश्वासाने पार पाडू असे आश्वासन दिले आहे. यावेळी राहता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक, सचिव उद्धव देवकर, तसेच कार्यकर्ते व कर्मचारी, काही सभासद उपस्थित होते.सुरक्षित अंतराचा वापर करत व मास्क वापरत ही सभा संपन्न झाली. राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमनपदी भाऊसाहेब जेजुरकर व सावळीविहीर चे बाळासाहेब जपे यांची उपसभापती निवड झाल्याबद्दल राहता तालुक्यातून आमदार राधाकृष्ण विखे,जि. प.च्यामाजी अध्यक्षा शालिनी विखे,माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पा.तसेच अहमदनगर जिल्ह्यातील विविध नेते,पदाधिकारी ,कार्यकर्ते यांच्याकडून जेजुरकर व जपे यांचे अभिनंदन होत आहे. उपसभापती निवड झाल्यानंतर बाळासाहेब जपे हे सावळीविहीर येथे येताच त्यांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ ग्रामस्थांनी भव्य स्वागत केले व त्यांचा सत्कार केला.या निवडीबद्दल त्यांचा पुष्पहार शाल देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती जिजाबा आगलावे, सरपंच संतोष आगलावे,गणेश आगलावे, माजी सरपंच रमेश आगलावे, माजी उपसरपंच शांताराम जपे,माजी सरपंच सोपानराव पवार,अनिल वाघमारे,भारत जपे,प्रमोद कोपरे,राजू कापसे,बाळासाहेब गमे,शिवाजी आगलावे,चंद्रशेखर जपे,सुनील जपे,किरण आगलावे,संजय मातेरे,पप्पू आगलावे आदींसह काही ग्रामपंचायत सदस्य,सोसायटी संचालक व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.