जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव तालुक्याचा पूर्व भाग झोडपला,पिके भुईसपाट

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्याचा संवत्सर,करंजी,भोजडे,दहिगाव बोलका,धोत्रे,वारी,कान्हेगाव आदी गावात आज दुपारी चार वाजेच्या सुमारास आलेल्या वादळी पावसाने धुमाकूळ घातला असून ऊस,मका,सोयाबीन,कपाशी,चारा पिके,पपई,डाळींब,आदी बागांसह अनेक पिके भुईसपाट केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिसकावला आहे.त्यामुळे या भागातील नुकसानीची पाहणी करणे गरजेचे बनले आहे.

तालुक्याच्या पूर्व भागात परतीच्या पावसाने खळबळ उडवली असून या भागात नुकसान केले आहे.मात्र जीवित हानी झाल्याचे कुठेही समोर आले नाही.मात्र पिकांची मोठी आर्थिक हानी झाल्याच्या बातम्या आहेत.व उद्या सकाळी आमचे अधिकारी व कर्मचारी या भागात पाहणी दौरा करणार असल्याचे सांगितले आहे.त्या नंतरच निश्चित नुकसानीचा अहवाल तयार करता येईल प्रथम दर्शनी या बाबत लगेच काही सांगता येणार नाही-अशोक आढाव-तालुका कृषी अधिकारी,कोपरगाव

आज सकाळ पासून वातावरणात प्रचंड उकाडा होता.त्यामुळे वादळी पाऊस होण्याचा धोका होता.तो आज दुपारी चार वाजेच्या सुमारास खरा ठरला आहे.येवलाअंदरसुल,खिर्डी गणेश,बोलकी,आदी भागातून पावसाने सुरुवात करून वादळाने त्यात भर घातल्याने शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागले आहे.सोयाबीन,मका,बाजरी,हि खरीप पिके तर कापूस व ऊस हि वार्षिक पिके आता अंतिम टप्य्यात आली असताना या वादळाने हा हातातोंडाशी आलेला घास हिसकावला आहे.वर्तमानात वातावरणात प्रचंड उकाडा आल्याने पिके लवकरच काढणीला आली असल्याने अनेक जणांनी तशी सुरुवातही केली होती बाजरीची पिके अनेकांची काढून झाली असताना हा निसर्गाचा प्रकोप आला आहे.मात्र या बाबत आमच्या प्रतिनिधीने तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी तालुक्याच्या पूर्व भागात परतीच्या पावसाने खळबळ उडवली असून या भागात नुकसान केले असल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे.मात्र जीवित हानी झाल्याचे कुठेही समोर आले नाही.मात्र पिकांची मोठी आर्थिक हानी झाल्याच्या बातम्या आहेत याला दुजोरा दिला आहे.व उद्या सकाळी आमचे अधिकारी व कर्मचारी या भागात पाहणी दौरा करणार असल्याचे सांगितले आहे.त्या नंतरच निश्चित नुकसानीचा अहवाल तयार करता येईल प्रथम दर्शनी या बाबत लगेच काही सांगता येणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.आता काढणीला आलेल्या पिकांवर हे अस्मानी संकट उभे राहिल्याने आता या वर कृषी विभाग काय भूमिका घेतो हे एक-दोन दिवसात समजणार आहे.

दरम्यान उशिराने आलेल्या बातमीत तालुक्याचे आ.आशुतोष काळे यांनी या पावसाचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे तालुका कृषी विभागास आदेश दिले असल्याची माहिती हाती आली आहे.

दरम्यान करंजी,भोजडे ग्रामपंचायत हद्दीत आज दुपारी आलेल्या परतीच्या पावसाने सोयाबीन,मका,पपई,चारा पिके,कापूस आदींचे मोठे नुकसान केले आहे.यातून शेतकरी सावरणे अवघड बनले आहे.हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिसकावला गेला असल्याची प्रतिक्रिया भोजडे येथील शेतकरी भगवान सिनगर यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close