कोपरगाव तालुका
..या उपनगराच्या जलवाहिणीचे विस्तारीकरण केंव्हा ?
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहराचे उपनगर असलेल्या ओमनगर या परिसरात जलवाहिनी टाकून आता बावीस वर्षाचा कालावधी उलटला आहे पूर्वीची जलवाहिनी लोकसंख्या वाढीमुळे आता पिण्याचे पाणी पुरविण्यास सक्षम राहिलेली नाही त्यामुळे कोपरगाव पालिकेने विस्तारीकरण करून नवीन जलवाहिनी टाकून द्यावी अशी महत्वपूर्ण मागणी या परिसरातील नागरिकांनी नुकतीच आमच्या प्रतिनिधिकडे बोलताना केली आहे.
या परिसरात ना रस्ते,ना पुरेसे पाणी,ना पुरेशा दाबाने वीज अशा अडचणींचा सामना या भागातील नागरिक सातत्याने करीत आहेत.मात्र निवडणुका जवळ आल्या की सर्वच पक्ष नेते आणि त्यांची पिलावळ या भागातील नागरिकांना आश्वासनाची खैरात करते मात्र दोन दशकानंतर हि हि उपेक्षा संपलेली नाही.त्यामुळे विविध समस्यांनी हा परिसर ग्रासला गेला आहे त्यामुळे पाणी पुरवठ्यासाठी जलवाहिनी विस्तारीकरण करून द्यावी-नागरिक
सदरचे सविस्तर वृत्त असे की,ओमनगर हा परिसर तसा कोपरगाव नगरपरिषद हद्दीत नाही हा परिसर ग्रामीण भागात मोडतो.मात्र नागरिकांचे सर्व व्यवहार कोपरगाव शहराशी होत आहे.मात्र नगरपरिषद हद्दीत हा परिसर येत नसल्याने पालिकेने या नागरिकांना दुप्पट पाणीपट्टी आकारणीच्या नावाखाली त्यांना १९९८ या वर्षात सुमारे चार इंची जलवाहिनी टाकून या परिसरात पाणी पुरवठा केला आहे.मात्र त्यानंतर या परिसराची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे.या परिसराच्या गरजाही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे.मात्र या परिसरात पायाभूत सुविधांची कायमच वानवा आहे.अनेक वेळा प्रयत्न करूनही हा भाग कोपरगाव शहर हद्दीत समाविष्ट झालेला नव्हता अलीकडील काळात नागरिकांनी वारंवार आपल्या भावनांचा उद्रेक केल्यावर हि उणीव भरून काढली गेली आहे.त्या मुळे या परिसरात ना रस्ते,ना पुरेसे पाणी,ना पुरेशा दाबाने वीज अशा अडचणींचा सामना या भागातील नागरिक सातत्याने करीत आहेत.मात्र निवडणुका जवळ आल्या की सर्वच पक्ष नेते आणि त्यांची पिलावळ या भागातील नागरिकांना आश्वासनाची खैरात करते मात्र दोन दशकानंतर हि हि उपेक्षा संपलेली नाही.त्यामुळे विविध समस्यांनी हा परिसर ग्रासला गेला आहे.त्यामुळे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी तरी या परिसरावर लक्ष केंद्रित करून या परिसराला आठ इंची जलवाहिनी टाकून न्याय द्यावा अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी शेवटी केली आहे.