कोपरगाव तालुका
कोपरगाव नगरपरिषदेची विशेष सर्वसाधारण सभा बोलवा-मागणी
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोरोना संकटामुळे कोपरगाव नगरपरिषदेच्या कार्यालयीन कामांवर व विकास कामांवर परिणाम झाला असून अनेक विकासकामे प्रलंबित आहेत. त्यामुळे कोपरगाव शहरातील नागरिकांच्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या विविध समस्या मार्गी लावण्यासाठी कोपरगाव नगरपरिषदेने तातडीने विशेष सर्वसाधारण सभा बोलवावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे गटनेते विरेन बोरावके यांनी कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्याकडे नुकतीच केली आहे.
कोपरगाव नगरपरिषदेची मागील सभा दिनांक २८ फेब्रुवारी रोजी झाली असून त्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजपर्यंत एकही सभा घेण्यात आलेली नाही. त्यामुळे या सहा महिन्याच्या कालावधीत नागरिकांचे अनेक जिव्हाळ्याचे प्रश्न अनुत्तरीत आहे. तसेच मागील काही दिवसांपासून कोपरगाव शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे संपूर्ण शहर सोमवार (दि.३१) पर्यंत लॉकडाऊन करण्यात आलेले आहे.
कोपरगाव शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागावा यासाठी आ.आशुतोष काळे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे पाच नंबर साठवण तलावाचे खोदाई काम पूर्ण करण्यात आले आहे.मात्र करण्यात आलेल्या कोरोनाच्या टाळेबंदीमुळे कोपरगाव नगरपरिषदेची सभा होवू शकली नाही त्यामुळे या साठवण तलावाचे पुढील काम मार्गी लावण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या हालचाली झाल्या नाहीत. तसेच मागील काही दिवसांपासून कोपरगाव शहरातील काही प्रभागात पिण्याच्या पाण्याच्या समस्येबरोबरच निर्माण झालेल्या इतर समस्या सोडविणे देखील गरजेचे असून त्यासाठी विशेष सभा बोलवावी. कोपरगाव नगरपरिषदेची मागील सभा दिनांक २८ फेब्रुवारी रोजी झाली असून त्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजपर्यंत एकही सभा घेण्यात आलेली नाही. त्यामुळे या सहा महिन्याच्या कालावधीत नागरिकांचे अनेक जिव्हाळ्याचे प्रश्न अनुत्तरीत आहे. तसेच मागील काही दिवसांपासून कोपरगाव शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे संपूर्ण शहर सोमवार (दि.३१) पर्यंत लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. आ. काळे यांच्या सूचनेनुसार प्रत्येक कुटुंबाची आरोग्य तपासणी सुरु करण्यात आली असून नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.या आरोग्य तपासणीत ज्या भागात यदाकदाचित कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढली किंवा भविष्यात हि संख्या वाढू नये यासाठी करावयाच्या उपाय योजना याबाबत सविस्तर चर्चा होणे गरजेचे आहे. कोरोनाचा वाढता धोका पाहता सर्व प्रकारची काळजी घेवून व शासनाचे सर्व नियम पाळून सभा घ्यावी. एकत्रित बैठक घेवून सभा घेणे शक्य नसल्यास ऑनलाईन सभा घ्यावी. रखडलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी सभा बोलाविणे अत्यंत गरजेचे असून सभा बोलावावीच अशी आग्रही मागणी गटनेते विरेन बोरावके यांनी प्रशांत सरोदे यांच्याकडे शेवटी केली आहे.