कोपरगाव तालुका
कोपरगाव शहराच्या प्रमुख रस्त्यांसाठी ६ कोटी निधी वर्ग
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहराच्या खराब झालेल्या प्रमुख रस्त्यांसाठी निधी मिळावा यासाठी केलेल्या प्रयत्नातून कोपरगाव शहरातील प्रमुख रस्त्यांसाठी कोपरगाव नगरपरिषदेला ६ कोटी रुपये निधी मिळाला असून हा निधी नगरपरिषदेच्या खात्यात जमा झाला असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.
कोपरगाव शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांसाठी निधी मिळावा यासाठी पाठपुरावा सुरु होता.मात्र मागील सहा महिन्यापासून उदभवलेल्या कोरोना विषाणूच्या महामारीमुळे निधी मिळण्यात अडचणी असतांना देखील शासनाकडून कोपरगाव शहराच्या रस्त्यांसाठी १४ व्या वित्त आयोगातून सहा कोटी रुपये निधी मिळाला आहे-आ.काळे
त्यांनी प्रसिद्धी पत्रकात पुढे असे म्हटले आहे की,”कोपरगाव शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांसाठी निधी मिळावा यासाठी पाठपुरावा सुरु होता.मात्र मागील सहा महिन्यापासून उदभवलेल्या कोरोना विषाणूच्या महामारीमुळे निधी मिळण्यात अडचणी असतांना देखील शासनाकडून कोपरगाव शहराच्या रस्त्यांसाठी १४ व्या वित्त आयोगातून सहा कोटी रुपये निधी मिळाला आहे.मिळालेल्या या निधीचा विनियोग योग्य पद्धतीने करून दर्जेदार रस्त्यांची निर्मिती करावी अशा सूचना आ.आशुतोष काळे कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाला दिल्या आहेत.सध्या संपूर्ण देशभर कोरोना संकटाने थैमान घातले असून सर्वच प्रकारच्या विकासकामांसाठी निधी उपलब्ध होण्यास अवधी लागत आहे. मात्र कोपरगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निधी मिळावा यासाठी शासनस्तरावर यापुढेही जास्तीत जास्त प्रयत्न करणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात शेवटी म्हटले आहे.