जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावातील जास्त कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील नागरिकांनीं आपल्याला विधानसभा निवडणुकीत निवडून दिल्याने आता विकासकामे करण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे.आपल्याला काही कारणाने जनतेचे आभार मानता आले नाही.मात्र या मतदारसंघातील विकासाचे जास्तीत जास्त प्रश्न मार्गी लावून मतदारांच्या ऋणातून उतराई होणार असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी मढी येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

आ.काळे यांनी या साठवण तलावाबाबत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची भेट घेवून येत असलेल्या सर्व प्रशासकीय अडचणी दूर केल्या असून या साठवण तलावाच्या कामाचा शुंभारंभ नुकताच आ. काळे यांच्या हस्ते करण्यात आला.४५ मीटर बाय १३० मीटर असलेल्या या साठवण तलावाची नियोजित आराखड्यानुसार ३ कोटी ४० लाख लिटर पाणी साठविण्याची क्षमता आहे.या साठवण तलावासाठी शाश्वत पाणी उपलब्ध व्हावे यासाठी गोदावरी कालव्याच्या आवर्तनातून पाणी आरक्षित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कोपरगाव तालुक्यातील मढी बु. ग्रामस्थांसाठी महत्वपूर्ण असलेला मात्र काही वर्षापासून प्रलंबित असलेला साठवण तलावाचा प्रश्न आ.काळे यांच्या प्रयत्नातून मार्गी लागला आहे.एच.डी.एफ.सी.बँक सी.एस.आर.अर्थसहाय्य परिवर्तन सामुदायिक विकास कार्यक्रम कोपरगाव प्रकल्प कार्यान्वित संस्था कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था मलकापूर यांच्या मार्फत मढी बु. साठवण तलावाच्या कामासाठी निधी देण्यात आला होता. मात्र साठवण तलावाच्या जागेवर काम सुरु करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या. मढी बु. ग्रामस्थ मागील चार वर्षापासून या साठवण तलावाचे काम सुरु व्हावे याबाबत पाठपुरावा करीत होते. मात्र त्याला यश आले नव्हते ते काम सुरु व्हावे अशी मागणी ग्रामस्थांनी नुकतीच केली होती.

आ.काळे यांनी या साठवण तलावाबाबत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची भेट घेवून येत असलेल्या सर्व प्रशासकीय अडचणी दूर केल्या असून या साठवण तलावाच्या कामाचा शुंभारंभ नुकताच आ. काळे यांच्या हस्ते करण्यात आला.४५ मीटर बाय १३० मीटर असलेल्या या साठवण तलावाची नियोजित आराखड्यानुसार ३ कोटी ४० लाख लिटर पाणी साठविण्याची क्षमता आहे.या साठवण तलावासाठी शाश्वत पाणी उपलब्ध व्हावे यासाठी गोदावरी कालव्याच्या आवर्तनातून पाणी आरक्षित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.साठवण तलावाचा प्रश्न सोडविल्याबद्दल मढी बु. ग्रामस्थांनी आ.काळे यांचे आभार मानले आहे.यासाठी कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्थेने मार्गदर्शन करून संस्थेचे अमीत नाफडे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प व्यवस्थापक रमेश बादाडे यांनी सहाय्य केले आहे. याप्रसंगी सरपंच मनीषा गवळी

याप्रसंगी सरपंच मनीषा गवळी,उपसरपंच अनिल गवळी,राष्ट्रवादी मागासवर्गीय सेलचे तालुकाध्यक्ष सुनील मोकळ,गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्टचे संचालक सुभाष गवळी,चिमणराव गवळी,अर्जुन गवळी,अण्णासाहेब गवळी,दिलीप गवळी,प्रकाश गवळी,संगिता मोकळ,ग्रामविकास अधिकारी रामेश्वर नेवगे सुरक्षित अंतर पाळुन उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close