जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

घरकुलांसाठी शेती महामंडळाची जागा मिळावी-मागणी

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील वारी येथे शेती महामंडळाच्या जागेत व सोमैय्या कारखान्याच्या खाजगी जागेत मोठ्या प्रमाणात रोजंदारीवर काम करणारे मजूर राहत आहेत. त्यांची शासनाच्या योजनेतील घरकुले देखील मंजूर आहेत.परंतु घरकुल बांधण्यासाठी त्यांच्याकडे जागाच नसल्याने गेली.अनेक वर्ष घरकुलांची प्रकरणे तशीच पडून आहे.त्यामुळे वारी येथे महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या साखरवाडी मळ्याची मोठ्या प्रमाणात शेत जमीन आहे.त्यातील दहा हेक्टर जमीन घरकुल बांधण्यासाठी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी वारी ग्रामपंचायतचे सदस्य राहुल टेके यांनी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे नुकतीच एका निवेदनाद्वारे केली आहे.

कोपरगाव तालुक्यातील वारी गावात मागासवर्गीय व आर्थिक दुर्बल घटकांची अनेक घरकुल मंजूर आहेत.मात्र ग्रामपंचायत वारी यांच्याकडे ही घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध नाही.या बाबत नगर जिल्हाधिकारी यांच्याकडे जागेची मागणी केली होती.परंतु जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी काही कारणास्तव प्रस्ताव फेटाळला.त्यामुळे आजही अनेक आर्थिक दुर्बल घटक घरकुला पासून वंचित आहेत.त्यांना सरकारने घरकुले मंजूर केली आहेत.

कोपरगाव तालुक्यातील वारी गावात मागासवर्गीय व आर्थिक दुर्बल घटकांची अनेक घरकुल मंजूर आहेत.मात्र ग्रामपंचायत वारी यांच्याकडे ही घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध नाही.या बाबत नगर जिल्हाधिकारी यांच्याकडे जागेची मागणी केली होती.परंतु जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी काही कारणास्तव प्रस्ताव फेटाळला.त्यामुळे आजही अनेक आर्थिक दुर्बल घटक घरकुला पासून वंचित आहेत.त्यांना सरकारने घरकुले मंजूर केली आहेत.अशी अनेक लोक सध्या शेती महामंडळाच्या साकरवाडी मळ्यात व गोदावरी बायोरिफायनरी या कारखान्यांच्या जागेमध्ये जवळपास चाळीस वर्षापासून वहिवाट करीत आहेत.दरम्यान याच कालखंडात नगर-मनमाड रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण याचे काम चालू आहे.त्यामुळे जवळपास वारी,साखरवाडी,भरतवाडी परिसरातील ८० कुटुंब बेघर होणार आहेत.महसूल मंत्री महामंडळाच्या बाबत सजग आहेत.त्यामुळे आपण या विषयात स्वतः लक्ष घालून महामंडळाची दहा हेक्टर जमीन उपलब्ध करून द्यावी.ती दिल्यास त्या परिसरात आरोग्य उपकेंद्र, अंगणवाडी, समाजमंदिर मुलांसाठी खेळण्याचे ठिकाणे सर्व समाजाला उपलब्ध होईल असेही टेके यांनी दिलेल्या निवेदनात शेवटी म्हटले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close