कोपरगाव तालुका
कोपरगाव तालुक्यातील त्या रुग्णांचा अहवाल प्राप्त
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीतील संशयित इसम येवला येथील कोरोनाची लागण झालेल्या इसमाच्या संपर्कात आल्याने सतर्क झालेल्या कोपरगाव तालुका प्रशासनाने त्या इसमासह चौघांना ताब्यात घेऊन त्यांना तपासणीसाठी नगर येथे पाठवले होते त्यांचे अहवाल आज प्राप्त झाला असून तो नकारात्मक आला असल्याची माहिती कोपरगाव तालुका वैद्यकीय अधिकारी संतोष विधाते यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.त्यामुळे तालुका प्रशासने सुटकेचा श्वास टाकला आहे.
नाशिक जिल्ह्यातील येवला हे कोरोना बाधित शहर नजीक असल्याने आ. आशुतोष काळे,नगराध्यक्ष विजय वहाडणे,तालुका प्रशासन व तहसीलदार योगश चंद्रे,पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर,अनिल कटके,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,तालुका व शहर आरोग्य विभाग आदींनी चोख काम पाहिल्याने आतापर्यंत हा तालुका दोन घटनेचा अपवाद वगळता सुरक्षित राहिल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
कोपरगाव तालुक्यात १० एप्रिल रोजी पहिला संशयित रुग्ण सापडला होता तर दुसरा रुग्ण शिंगणापूर येथील सारीचा होता.त्यात त्या दोन्ही रुग्णाचे निधन झाले होते.त्या मुळें तालुक्यात खळबळ उडाली होती.शहरात कडेकोट बंदोबस्त राबविण्यात आला होता.तो पासून आजपावेतो नवीन रुग्ण आढळला नव्हता.तथापि सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीत एक संशयित कुटुंब व त्या नंतर कोपरगाव येथील महिला महाविद्यालया नजीक एक संशयित व्यक्ती आरोग्य विभागाने खबरदारी म्हणून ताब्यात घेतले होते.तथापि आज सुरेगाव येथील संशयितांचे अहवाल आज प्राप्त झाला असून त्यात त्याचा अहवाल निरंक आला आहे.त्यामुळे प्रशासनाने सुटकेचा श्वास टाकला आहे.
नाशिक जिल्ह्यातील येवला हे कोरोना बाधित शहर नजीक असल्याने आ. आशुतोष काळे,नगराध्यक्ष विजय वहाडणे,तालुका प्रशासन व तहसीलदार योगश चंद्रे,पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर,अनिल कटके,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,तालुका व शहर आरोग्य विभाग आदींनी चोख काम पाहिल्याने आतापर्यंत हा तालुका दोन घटनेचा अपवाद वगळता सुरक्षित राहिल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.आगामी काळातही नागरिकांनी हे सहकार्य ठेवणे अपेक्षित आहे.