जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

..या शहरात ६९ हजार ७१३ व्यक्तींची कोरोना तपासणी पूर्ण

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव नगरपरिषद हद्दीत कोरोना विषाणूची लागण थोपविण्यासाठी शहरातील १४ हजार २२७ कुटुंबाची तपासणी अकरा पथकाद्वारे करून त्यांच्या ६९ हजार ७१३ व्यक्तींची विविध आजारांची तपासणी करून आजाराची खातरजमा करण्यात आली आहे.यात परदेशी ४७ नागरिकांचा तर १ हजार १८३ नागरिकांना देखभालीत ठेवण्यात आले होते अशी माहिती कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी दिली आहे.

यावेळी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी सदर आरोग्य पथकातील कर्मचारी देश सेवे करिता आपल्या जीवावर उदार होवून कार्य करत असून जर सर्व्हे मध्ये कोणते कुटुंब आपल्या कडे आलेल्या आरोग्य पथकास माहिती देण्यास टाळाटाळ करून सहकार्य करत नसेल तर त्यांच्यावर साथरोग प्रतिबंधात्मक कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे.

भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या १४२ ने वाढून ती ५९ हजार ८३२ इतकी झाली असून १९८७ जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर हि संख्या १९ हजार ०६३ वर पोहचली आहे.राज्यात या विषाणूने ७३१ जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या ५३ वर जाऊन पोहचली आहे तर दोघांचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.मुंबई,ठाणे,पुणे मालेगाव हि कोरोनाची नवी हॉटस्पॉट ठरली आहेत.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्रातील टाळेबंदी तिसऱ्यांदा वाढवून १७ मे पर्यंत केली आहे.ती मे अखेर पर्यंत वाढविण्याचे सूतोवाच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केले आहे.कोपरगाव तालुक्यात दोन बळी गेले आहे.लक्ष्मीनगर येथील महिलेचे निधन हि घटना धक्कादायक होती.नागरिकांत अद्यापही या साथीबाबत भय दिसून येत आहे.या पार्श्वभूमीवर कोपरगाव नगरपरिषदेने प्रतिबंधात्मक उपाय योजना सुरू केल्या होत्या. दि.०३ मे पासून दुसरी फेरी सुरु केली असून या मध्ये थर्मल स्कॅनर व पल्स ऑक्सीमीटर द्वारे प्रत्येक कुटुंबाचा व कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची तपासणी करण्यात येत आहे. यात आज पर्यंत एकूण ८५५ कुटुंब व ४०१० नागरिकांची पाहणी करण्यात आलेली आहे. तसेच यापुढे हि या पुढील काळात शहरातील सर्व कुटुंबाचा पाहणी करण्यात येणार आहे अशी माहिती मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी दिली.
याकामी कोपरगांव नगरपरिषदेचे डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.गायत्री कांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली एएनएम, आशा स्वयंसेविका व न.प. कर्मचारी हे विशेष मेहनत घेत आहेत. त्यांच्या कार्याबाबत मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, आरोग्य सभापती, सर्व नगरसेवक, नगरसेविका व नगरपरिषद अधिकारी आदींनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close