जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

…या महाविद्यालयात नवप्रवेशित विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन वर्ग संपन्न

न्यूजसेवा

कोपरगांव -(प्रतिनिधी)

  कोपरगाव शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या सद्गुरू गंगागीर महाराज महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील प्रथम वर्ष कला,वाणिज्य व बी.बी.ए.वर्गातील नवप्रवेशित विद्यार्थ्यांसाठी नुकताच दोन दिवसीय उद्बोधन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला आहे.विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवनाची ओळख,विविध शैक्षणिक व सहशैक्षणिक उपक्रमांची माहिती तसेच करिअरविषयक मार्गदर्शन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.माधव सरोदे हे होते.

सद्गुरू श्री.गंगागीर महाराज महाविद्यालयात मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले तो क्षण.

“विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी महाविद्यालयात विविध शैक्षणिक,सांस्कृतिक,क्रीडा व कौशल्य विकास उपक्रम राबविले जातात.प्रत्येक विद्यार्थ्याने मोठी स्वप्ने पाहून ती साकार करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहावे.विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाची प्रभावी ओळख व्हावी आणि महाविद्यालयीन शिक्षणाशी सहज जुळवून घेता यावे यासाठी ब्रिज कोर्सची व्यवस्था करण्यात आली आहे”-डॉ.माधव सरोदे,प्राचार्य,श्री.सद्गुरू गंगागिरीजी महाराज महाविद्यालय,कोपरगाव.

   यावेळी अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ.माधव सरोदे म्हणाले,“विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी महाविद्यालयात विविध शैक्षणिक,सांस्कृतिक,क्रीडा व कौशल्य विकास उपक्रम राबविले जातात.प्रत्येक विद्यार्थ्याने मोठी स्वप्ने पाहून ती साकार करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहावे.विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाची प्रभावी ओळख व्हावी आणि महाविद्यालयीन शिक्षणाशी सहज जुळवून घेता यावे यासाठी ब्रिज कोर्सची व्यवस्था करण्यात आली आहे.महाविद्यालयातील प्रत्येक उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविताना शिस्त,जबाबदारी आणि आई-वडिलांकडून मिळालेल्या संस्कारांचे पालन करणे हेच यशस्वी व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.

   यावेळी विविध विभागप्रमुखांनी विद्यार्थ्यांना आपल्या विभागांची तसेच महाविद्यालयातील विविध उपक्रमांची माहिती दिली.आय.क्यू.ए.सी.विषयी डॉ.निलेश मालपुरे,राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी प्रा.डॉ.ए.बी.भागवत,शिष्यवृत्ती योजनांविषयी धीरज सोनवणे,विद्यार्थी विकास मंडळाविषयी डॉ.माधव यशवंत,परीक्षा विभागाविषयी डॉ.देविदास रणधीर,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाविषयी डॉ.सीमा चव्हाण,शॉर्ट टर्म कोर्सेसविषयी प्रा.तानसेन रणदिवे,संशोधन विभागाविषयी डॉ.विलास गाढे,राष्ट्रीय सेवा योजनेविषयी प्रा.डॉ.बंडेराव तऱ्हाळ,सांस्कृतिक विभागाविषयी प्रा.संतोष पवार,एन.सी.सी.विभागाविषयी प्रा.चंद्रभान चौधरी,ग्रंथालयाविषयी प्रा.चंद्रशेखर खैरनार,जिमखाना विभागाविषयी डॉ.विशाल पवार,प्लेसमेंट व करिअर मार्गदर्शनाविषयी प्रा.दिलीप भोये तसेच महिला अत्याचार प्रतिबंधक समितीविषयी डॉ.उज्ज्वला भोर यांनी विद्यार्थ्यांना उपलब्ध सुविधा,सेवा व विविध संधींची सविस्तर माहिती दिली आहे. यावेळी प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांचे स्वागत करण्यात आले.तसेच कु.ईश्वरी वाकचौरे,चि.सार्थक घोडके आणि चि.तेजस संवत्सरकर यांनी मनोगत व्यक्त केले.

   सदर उद्बोधन कार्यक्रमाच्या समारोप सत्रासाठी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ,सातारा येथील प्रभारी कुलसचिव डॉ.विजय कुंभार आदी मान्यवर दूरदृष्टी प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
   सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य डॉ.अर्जुन भागवत यांनी केले आहे तर विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ.घनश्याम भगत,कार्यालय अधीक्षक सुनील गोसावी, कला,वाणिज्य व बी.बी.ए.विभागातील सर्व प्राध्यापक तसेच नवप्रवेशित विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सुनील काकडे यांनी केले,तर आभार प्रा.महेश दिघे यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close