कोपरगाव तालुका
महात्मा बसवेश्वरांचा श्रमसंस्कार प्रेरणादायी
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
जगतज्योती,समाजसुधारक महात्मा बसवेश्वर यांनी १२ व्या शतकात स्त्री-पुरुष,उच्च-निच,गरिब-श्रीमंत हे भेद नष्ट करण्यासाठी सर्वप्रथम कार्य केले आहे.’श्रमाला प्रतिष्ठा हवी’ हा त्यांचा मंत्र उर्जा देणारा आहे.समानतेचा पुरस्कार करणारे आद्य समाजसुधारकांचा विचार सर्वांनाच प्रेरणादायी असल्याचे तहसिलदार योगेश चंद्रे यांनी सांगितले.
महात्मा बसवेश्वरांनी श्रमाला प्रतिष्ठा देण्याचे महान कार्य केले त्यांच्या कार्याची दखल कल्याणच नव्हे तर कल्याणच्या आसपास, संपूर्ण दक्षिण भारतात, संपूर्ण उत्तर भारतात, इराक-इराण अफगाणिस्तानपर्यंत बसवण्णांचा विचार जाऊन पोहोचला. त्या विचाराने प्रभावित होऊन शरण कल्याणच्या अनुभवमंटपाकडे येऊ लागले. कल्याण म्हणजे सध्याचे बसवकल्याण हे क्रांतीचे केंद्र बनले.
बसवण्णा बाराव्या शतकात कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील इंगळेश्वर-बागेवाडी या गावात ११०५ साली प्रतिष्ठित पशुपात शैव कम्मेकुलातील एका कुटुंबात बसवेश्वरांचा जन्म झाला. काहींच्या मते तो इंगळेश्र्वर (जि. विजापूर) या गावी झाला असावा. त्यांच्या जन्मकाळाविषयी मतभेद असले, तरी सामान्यतः त्यांचा जन्म वैशाखातील अक्षय्य तृतीयेला झाल्याचे मानले जाते. त्यांचे वडील मादिराज आणि आईचे नाव मादलांबिका बसवेश्वरांच्या भावाचे नाव देवराज व बहिणीचे नाव नागम्मा होते.वयाच्या आठव्या वर्षी ज्ञान मिळविण्यासाठी ते कृष्णा व मलप्रभा या नद्यांच्या संगमावरील कुडलसंगम येथे गेले, ते पशुपात शैवांचे प्राचीन अध्ययन केंद्र होते. तेथे बसवेश्वरांनी बारा वर्षे वास्तव्य केले. कूडलसंगम येथे त्यांनी वेगवेगळ्या भाषा, धर्म, तत्त्वज्ञान इत्यादींचा अभ्यास केला. त्यांचा विवाह त्यांच्या मामाच्या मुलीशी झाला. तेव्हा ते सोलापुरातील मंगळवेढा येथे आले. तेथे ते एकतीस वर्षे राहिले.पुढे त्यांनी श्रमाला प्रतिष्ठा देण्याचे महान कार्य केले त्यांच्या कार्याची दखल कल्याणच नव्हे तर कल्याणच्या आसपास, संपूर्ण दक्षिण भारतात, संपूर्ण उत्तर भारतात, इराक-इराण अफगाणिस्तानपर्यंत बसवण्णांचा विचार जाऊन पोहोचला. त्या विचाराने प्रभावित होऊन शरण कल्याणच्या अनुभवमंटपाकडे येऊ लागले. कल्याण म्हणजे सध्याचे बसवकल्याण.हे क्रांतीचे केंद्र बनले.त्यांनी जातीभेद नष्ट करण्याचा प्रयत्न केला.या महान विचारवंताला त्यांच्या जयंती निमित्त कोपरगावात भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.सदर प्रसंगी तहसिलदार योगेश चंद्रे यांचे शुभहस्ते प्रतिमापुजन करण्यात आले.याप्रसंगी पुरवठा अधिक्षक सचिन बिन्नोड,समन्वयक सुशांत घोडके, बाळासाहेब गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.