कोपरगाव तालुका
शेततळ्यात विषारी औषध,शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान !
संपादक-नानासाहेब जवरे
माहेगाव देशमुख-(प्रतिनिधी)
तळ्यात मत्स्य बीज टाकून त्यातून माशाचे चांगले उत्पन्न मिळाले असताना व त्याची जून मध्ये विक्री चालू होऊन ठोक भावाने सात लाख रुपये उत्त्पन्न हातात येणे अपेक्षित असताना अज्ञात आरोपीने शेततळ्याचे उत्तर बाजूने संरक्षक जाळी तोडून आत प्रवेश करत विषारी औषध तळ्यात टाकले असल्याची बाब किरण यांच्या लक्षात शनिवारी दुपारी खाद्य टाकण्यास गेले असता आली.त्यांना शेकडो मृतमासे पाण्यावर तरंगताना दिसल्याने खळबळ उडाली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी-कोपरगाव रस्त्यालगत माहेगाव देशमुख शिवारात रावसाहेब सोपान शिंदे या शेतकऱ्यांची १ हेक्टर ८८ आर. शेती आहे.महाराष्ट्र शासन कृषी विभागाअंतर्गत २०१५ मध्ये वीस गुंठ्यात शेततळे घेत पाणी साठवणूक करून शेतीत बारमाही पिके घेण्या बरोबर उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने शेतीला जोड धंदा म्हणून शेत तळ्यात मुलगा किरण याने आक्टोबर २०१९ मध्ये मर्हळ जातीचे दोन लाख रुपये किमतीचे सोळा हजार बीज सोडुन आजपर्यंत खाद्य व जाळी वर एक लाख रुपये खर्च केला होता. जून मध्ये मासे विक्री चालू होऊन ठोक भावाने सात लाख रुपये उत्त्पन्न हातात येणे अपेक्षित असताना अज्ञात आरोपीने शेततळ्याचे उत्तर बाजूने संरक्षक जाळी तोडून आत प्रवेश करत विषारी औषध तळ्यात टाकले असल्याची बाब किरण यांच्या लक्षात शनिवारी दुपारी खाद्य टाकण्यास गेले असता आली.त्यांना शेकडो मृतमासे पाण्यावर तरंगताना दिसले व पाण्याचा रंग पांढरा होऊन दुर्गंधी येत असल्याचे जाणवले कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांचीे भेट घेत अज्ञात आरोपीचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे.
त्यांनी मत्स्य विकास अधिकारी यांच्या अहवाला शिवाय गुन्हा नोंद करता येणार नाही असा त्यांना सल्ला दिला आहे. विष बाधा कुठल्या कारणाने झाली, विषारी औषध कोणते ? हे तपासण्याचे काम अहमदनगर मत्स्य विकास अधिकारी यांचे कडे असल्याने शिंदे यांनी मत्स्य विभाग प्रमुख यांचेशी संपर्क केला असता आम्हास कोरोना बंदोबस्त कामी नेमण्यात आले आहे.इतक्या दूरवर आम्हास येण्यासाठी शासकीय वाहन नाही मासे बाहेर काढून पुरून टाकण्याचा अजब सल्ला शिंदे यांना देण्यात आला आहे.टाळेबंदीच्या काळात सर्व उदयोग-धंदे बंद असताना शेतकरी राजा जनतेची भुख भागवण्यासाठी काबाड कष्ठ करून राबत असताना या गंभीर बाबतीत शासकीय अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करणे हि गंभीर बाब आहे.या अगोदर शेतातून विद्युत पम्पाची केबल ऊस व मका पीक चोरीला जाण्याच्या घटना वारंवार घडत असताना आता हे आणखी एक सुलतानी संकट या शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे.या बाबत शासकीय अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेणे गरजेचे आहे.