जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

लिंगायत समितीच्या वतीने निराधारांना पुरण पोळीचे जेवण

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

अक्षय तृतीया व महात्मा बसवेश्वरांची जयंतीचे निमित्त साधून कोपरगाव शहरातील कोपरगाव तालुका लिंगायत संघर्ष समितीच्या वतीने ९१५ निराधार व्यक्तींना पुरणपोळीचे जेवण देण्यात आले असल्याची माहिती कोपरगाव तालुका लिंगायत संघर्ष समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

महात्मा बसवेश्वरांनी श्रमाला प्रतिष्ठा देण्याचे महान कार्य केले त्यांच्या कार्याची दखल कल्याणच नव्हे तर कल्याणच्या आसपास, संपूर्ण दक्षिण भारतात, संपूर्ण उत्तर भारतात, इराक-इराण अफगाणिस्तानपर्यंत बसवण्णांचा विचार जाऊन पोहोचला. त्या विचाराने प्रभावित होऊन शरण कल्याणच्या अनुभवमंडपाकडे येऊ लागले. कल्याण म्हणजे सध्याचे बसवकल्याण हे क्रांतीचे केंद्र बनले.होते त्यांची आज जयंती असल्याचे औचित्य साधून कोपरगाव तालुका लिंगायत संघर्ष समितीच्या वतीने निराधारांना मिष्टान्न भोजन देण्यात आले आहे.

महात्मा बसवेश्वरांनी श्रमाला प्रतिष्ठा देण्याचे महान कार्य केले त्यांच्या कार्याची दखल कल्याणच नव्हे तर कल्याणच्या आसपास, संपूर्ण दक्षिण भारतात, संपूर्ण उत्तर भारतात, इराक-इराण अफगाणिस्तानपर्यंत बसवण्णांचा विचार जाऊन पोहोचला. त्या विचाराने प्रभावित होऊन शरण कल्याणच्या अनुभवमंडपाकडे येऊ लागले. कल्याण म्हणजे सध्याचे बसवकल्याण हे क्रांतीचे केंद्र बनले.होते त्यांची आज जयंती असल्याचे औचित्य साधून कोपरगाव तालुका लिंगायत संघर्ष समितीच्या वतीने निराधारांना मिष्टान्न भोजन देण्यात आले आहे.या उपक्रमाखेरीज समता परीवार व कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशनच्या वतीने कोरोनाच्या पाश्वभूमीवर लाॅकडाऊनच्या काळात कोपरगाव शहरातील दररोज ७०० ते ८०० गरजू,निराधार व्यक्तीना घरपोच डबे देत आहे.
सदर प्रसंगी समता इंटरनॅशनल स्कूल शालेय पोषण आहार समिती च्या अध्यक्षा सुहासिनी कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली भोजन व्यवस्था आचारी, कर्मचारी समता पतसंस्थेचे चे विविध विभागाचे कर्मचारी, कोपरगाव तालुका लिंगायत संघर्ष समितीचे सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले.या समाजसेवेच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात समता इंटरनॅशनल स्कूलच्या संचालक स्वाती कोयटे,विश्वस्त संदीप कोयटे,लियो क्लब आॅफ समता चे अध्यक्ष कुलदीप कोयटे व कोपरगाव लिंगायत संघर्ष समितीचे प्रदीप साखरे,सतीश निळकंठ व शहरातील समाज बांधव, हितचिंतक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close