कोपरगाव तालुका
आंदोलनाच्या दुसरा दिवस,एक अधिकारी वगळता कोणीही फिरकलें नाही !
न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरानजीक असलेल्या साईबाबा चौक परिसरात असलेली महार वतनाची ५०.३३ एकर जमीन परस्पर वाटून घेणाऱ्या आणि ०१ हजार कोटी रुपयांचा घोटाळा करून त्या जमिनीची परस्पर विल्हेवाट लावणाऱ्यांच्या विरुद्ध अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करावा या प्रमुख मागणीसाठी नगरपरिषद आणि महसूल विभागाला जाग आणण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी काल सकाळी 10 वाजता डॉ.आंबेडकर स्मारकासमोर बेमुदत उपोषण सुरू केले असून आज दुसऱ्या दिवशी कोपरगाव तसील कार्यालयाचे नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे यांनी आंदोलन कर्त्यांची भेट घेतली असून पोलिस अधिकाऱ्यांशी बोलून समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले असल्याचे कळवले आहे.

आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी कोपरगाव तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे वगळता अन्य कोणी त्याकडे फिरकले नसल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली असून,”आमच्या जमिनींचा ताबा आम्हाला द्या कायदा हातात घ्यायला लावू नका” असा इशारा आंदोलनस्थळी दिला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,” कोपरगाव ग्रामीण हद्दीत गट क्रमांक अनुक्रमे ५,६,७,८,९ हे पूर्वीचे ०५ गट क्रमांकाच्या महार वतनाच्या जमिनी आहेत.त्याच पुढे सिटी सर्व्हे होऊन त्याचा क्रमांक हा १९३५ झाला आहे.या ५०.३३ एकर क्षेत्राची आजची किंमत जवळपास ०१ हजार कोटी रुपयांच्या जवळपास आहे.हे आमचे वडिलोपार्जित महार वतनाचे क्षेत्र आहे हे तहसील कार्यालय,प्रांत कार्यालय,जिल्हाधिकारी कार्यालयात सिद्ध झाले आहेच पण सेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब जाधव यांनी केलेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या याचिकेत हे सिद्ध झाले आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी महात्मा गांधी प्रदर्शन ट्रस्टची अवैध नोंद हटवली आहे.वर्तमानात आंदोलनकर्त्यांनी केलेल्या तक्रारीत केलेल्या पुराव्यात मंडलाधिकारी यांनीही ही जमीन महार वतनाची म्हणजेच आमच्या वाली वारसांची असल्याचा अहवाल दिला असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

कोपरगाव शहरातील रहिवासी असलेले दुशिंग व कोपरे हे त्याचे कायदेशीर वारस आहे हे सप्रमाण सिद्ध झाले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.क्स्र प्रत्यक्षात त्यांना ताबा भेटत नसल्याचा त्यांचा आरोप आहे.परिणामी त्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.आज त्याचा दुसरा दिवस होता.मात्र कोपरगाव तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे वगळता अन्य कोणी त्याकडे फिरकले नसल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली असून आमच्या जमिनींचा ताबा आम्हाला द्या कायदा हातात घ्यायला लावू नका असा इशारा आंदोलनस्थळी दिला आहे.



