नगर जिल्हा
.. या ग्रामपंचायतीने दिव्यांगांना केले धनादेश वाटप
संपादक-नानासाहेब जवरे
नांदूखीं-(प्रतिनिधी)
राहता तालुक्यातील नांदुर्रखी खुर्द दिव्यांग बांधवांना देखील पाच टक्के धनादेशद्वारे निधीचे वितरण नुकतेच करण्यात आले आहे.ग्रामपंचायतीचे उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
समाजातील दृष्टीहीन, कर्णबधिर, अस्थिव्यंग, मनोविकलांग व कुष्ठरोगमुक्त अपंग व्यक्तींकडे त्यांच्या अपंगत्वाकडे न पाहता त्यांच्यामध्ये असलेल्या सामर्थ्यांकडे पाहून त्यांच्या मधील असलेले सुप्त सामर्थ्य विकसित करुन त्यांना समाज जीवनाच्या सर्व अंगामध्ये समान संधी,संपूर्ण सहभाग व त्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय,तसेच इतर विविध विभागांमार्फत कल्याणकारी योजना राबविण्यात येतात.
त्याचप्रमाणे सामाजिक सुरक्षिततेसाठी अपंगांना काही क्षेत्रामध्ये आरक्षण,सवलती,सूट व प्राधान्य देण्यात आलेले आहे. हि बाब लक्षात घेऊन व वर्तमानात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर दिव्यांग नागरिकांना साहाय्य व्हावे या साठी नांदूरखीं ग्रामपंचायतीने आपल्या पाच टक्के निधीतून धनादेश देण्याचा निर्णय घेतला आहे.त्याची नुकतीच अंमलबजावणी करण्यात आली आहे.सदर प्रसंगी सरपंच बापूराव वाणी, उपसरपंच सतीश वाणी,सदस्य ग्रामसेवक सांगळे सतीश,ग्रामपंचायत कर्मचारी अमोल डांगे, आप्पासाहेब वाणी बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.