कोपरगाव तालुका
…या ठिकाणी कै.ना.धो.महानोर यांना श्रद्धांजली

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
जेष्ठ साहित्यिक,रानकवी कै.ना.धो.महानोर यांचं नुकतंच निधन झाले.साहित्य विश्वात एक पोकळी निर्माण झाली असून साहित्य विश्वाची न भरणारी हि एक पोकळी निर्माण झाली असल्याचे प्रतिपादन कोपरगावात विविध मान्यवरांनी केले आहे.
ना.धों.महानोर यांचे अनेक कवितासंग्रह वाचकांच्या विशेष पसंतीस उतरले.त्यात अजिंठा या दीर्घ काव्यसंग्रहाचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.त्याचबरोबर गंगा वाहू दे निर्मळ,जगाला प्रेम अर्पावे,दिवेलागणीची वेळ,पावसाळी कविता,रानातल्या कविता असे त्यांचे कवितासंग्र लोकप्रिय ठरले.यासह गपसप,गावातल्या गोष्टी हे कथासंग्रहदेखील वाचकांच्या पसंतीस उतरले होते.
प्रसिद्ध कवी,गीतकार ना.धों.महानोर यांचं निधन झालं आहे.वयाच्या ८१ व्या वर्षी कवी ना.धों महानोर यांनी अखेरचा श्वास घेतला.उपचारांदरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे.ना.धों.महानोर यांच्या निधनाने साहित्य विश्वावर शोककळा पसरली आहे.ग्रामीण जीवन शब्दबद्ध करणारा,गावगाड्यातील गोष्टी सोप्या शब्दात मांडणारा संवेदशील माणूस हरपल्याची भावना कोपरगावसह राज्यात पसरली आहे.शब्द गंध साहित्यिक परीषद महाराष्ट्र राज्य कोपरगाव शाखेच्या वतीने स्व.र.म.परीख हिंदी तथा मराठी सार्वजनिक ग्रंथालय वाचनालयाच्या वतीने श्रद्धांजलीचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
शब्द गंध साहित्यिक परिषदेचे अध्यक्ष कवी कैलास साळगट,कार्याध्यक्ष प्रा.डॉ.संजय दवंगे,शैलजा ताई रोहोम आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर प्रसंगी कवी प्रमोद येवले यांनी प्रास्ताविक केले आहे.तर या वेळी ना.धो.महानोर यांच्या जन्मस्थान व पळसखेड येथील रानकविता,निसर्गाच्या सानिध्यात राहून आलेल्या कवितांवर आधारित चर्चा करण्यात आली कवी प्रमोद येवले यांनी अ.नगर येथील सायबान मळा येथे झालेल्या साहित्य संमेलनात लाभलेला महानोरांचा सहवास आठवणी जाग्या केल्या आहे.