कोपरगाव तालुका
कोपरगांव…या बँकेचा ‘क्यु.आर.’कोड चा शुभारंभ

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
अ.नगर,औरंगाबाद व नाशिक जिल्ह्यात शाखा विस्तार असलेली कोपरगांव पिपल्स को-ऑप.बँकेने नुकताच क्यु.आर.कोड चा शुभारंभ बँकेचे अध्यक्ष कैलास भागचंद ठोळे यांचे शुभहस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आला आहे.
“बँकेचे अमृत महोत्सव वर्ष चालु असून अमृत महोत्सवी वर्षात बँकेने डिजीटल बँकींग युगाची सुरूवात करून मोबाईल बँकींग सुविधा,गुगल पे,फोन पे यु.पी.आय.या सुविधेबरोबरच क्यु.आर.कोड सुविधेचा शुभारंभ केलेला आहे”-कैलास ठोळे,अध्यक्ष,कोपरगाव पीपल्स बँक.
‘डेंसो वेव्ह’ या जपानी कंपनीने सर्वप्रथम वाहनांना ट्रॅक करण्यासाठी (QR Code) ची निर्मिती केली व त्याआधारे वाहनांना ट्रॅक करणे अत्यंत सुलभ झाले आणि नंतर या कोड ची विशेषतः पाहता हा क्यु.आर.कोड संपूर्ण जगभर पसरला.तसेच आता हा क्यु.आर.कोड एवढा विकसित झाला आहे कि,या मध्ये विविध प्रकारची माहिती स्कॅन केली जाते,आणि त्याचप्रमाणे ऑनलाईन पेमेन्ट करण्यासाठी सुद्धा याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.हि सोपी पद्धत असल्याने लोकप्रिय झाली असून बँकामध्ये त्याचा वापर मोठया प्रमाणावर वाढला असून कोपरगाव शहरातील सहकारात अग्रणी असलेल्या कोपरगाव पीपल्स को.ऑप.बँकेने यात पुढाकार घेतला असून आपल्या सभासदांना हि आधुनिक सोय करून दिली आहे.त्याचे सभासदांनी स्वागत केले आहे.या प्रसंगी बँकेचे खातेदार विशाल बडजाते,सुशांत घोडके,सतिष उपाध्ये,अमोल सानप,श्रीकांत राठी यांना प्रातिनिधीक स्वरूपात क्यु.आर.कोड चे वाटप करून शुभारंभ करण्यात आला आहे.
सदर प्रसंगी बँकेचे अध्यक्ष कैलास ठोळे,उपाध्यक्ष भाऊसाहेब लोहकरे व संचालक कल्पेश शहा,धरमकुमार बागरेचा,सुनिल बंब,सत्येन मुंदडा,रविंद्र ठोळे,सुनिल बोरा,मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक एकबोटे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
त्या वेळी उपस्थित खातेदार यांनी सांगितले की,”आपल्या कोपरगांव पिपल्स बँकेने डिजिटल युगानुसार बदल करून डिजिटल प्रणाली चालु केल्यामुळे बँकेच्या खातेदारांना आर्थिक व्यवहार करणे सुलभ झाले असून बँकींग व्यवहार करण्याकरीता खातेदारांना आपल्या दुकानांतून किंवा घरीबसुन व्यवहार करता येत आहे.त्यामुळे आपल्या पिपल्स बँकेने चालु केलेल्या डिजिटल बॅकींग करीता शुभेच्छा दिल्या आहेत.
मुख्य कार्यालयातील संगणक विभाग यांनी लक्षवेधी काम केल्या बद्दल संगणक विभागांचे प्रमुख चंद्रशेखर व्यास व गणेश काळे यांचा सत्कार करण्यात आला आहे.
सदर प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्तविक सहाय्यक महाव्यवस्थापक जितेंद्र छाजेड यांनी केले तर व सुत्रसंचालन पुजा पापडीवाल यांनी तर आभार सुनिल बोरा यांनी मानले आहे.