जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

हॉटेल मध्ये चालत होता वेश्या व्यवसाय,कोपरगावात आरोपी जेरबंद

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

शिर्डी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनीं शिर्डी शहर परिसरात पिंपळवाडी रोड येथील बंगल्यात वेश्या व्यवसायावर छापा टाकून एक हाय प्रोफाईल रॅकेट उघड केले असताना काल रात्री कोपरगाव शहारानजीक ‘हॉटेल कल्पतरू’ या ठिकाणी आरोपी विजय सोपान मवाळ (वय-५९) रा.इंदिरानगर याचेकडे बनावट ग्राहक पाठवून आरोपीस पंचासमक्ष अटक केली आहे.त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दरम्यान आरोपी विजय मवाळ याने आपल्या ‘हॉटेल कल्पतर याचा वापर करून त्या ठिकाणी खोल्या उपलब्ध करून देऊन वेश्या व्यवसायाला रान मोकळे करून दिले असल्याचे उघड झाले आहे.त्याची गुप्त खबर पोलिसांना लागल्यावर त्यांनी त्या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून त्या ठिकाणीच पर्दाफाश केला आहे.त्यात एका शेजारच्या जिल्ह्यातील तर अन्य एक पश्चिम बंगाल मधील अशा दोन तरुणींना जेरबंद केले आहे.त्यामुळे कोपरगाव शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे.

कोपरगाव शहर आणि तालुक्यात चोरट्यांचा उपद्रव अद्याप कमी होण्याचे नाव घेताना दिसत नसून काही दिवसापूर्वी
वडांगळे वस्ती येथील चोरीचा गुन्हा दाखल झाल्याची शाई वाळते न वाळते तोच कोपरगाव येथील साखरे स्टील यांची ५० हजारांची चोरी झाली असून त्याच रस्त्यालगत योगीराज फर्निचर,संस्कृती साडी डेपो आदिसंह सात दुकाने फोडली असल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती याधीही पूनम चित्रपट गृहासमोर व व्यापारी धर्मशाळेसमोर तीन दुकाने फुटली असून एका आठवड्यात तीन दुचाकी चोरीस गेल्या असताना नूकताच भर दुपारी दिडच्या सुमारास अजिंक्य लक्ष्मण कदम यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील तीन तोळे दागिने १५-२० हजारांची रोकड असा सुमारे ०२ लाखांची चोरी झाली होती.चारचाकी आणि दुचाकी चोऱ्यांची तर गणतीच नाही त्यामुळे चोरट्यांवर पोलिसांचा धाक राहिलेला नाही अशातच नाशिक येथील लाचलुचपत विभाग,स्थानिक गुन्हे शाखा,आदी वेळोवेळी धाडी टाकून गुटखा,अवैध दारू,व तत्सम विविध अवैध व्यवसाय तर मोठया प्रमाणावर फोफावला आहे.त्यात वरिष्ठ अधिकारी शहर व तालुका पोलिसांची नाचक्की करताना दिसत असताना आता त्या ठिकाणी शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक पदी प्रदीप देशमुख हे आता नव्याने दाखल झाल्याने त्यात सुधारणा होण्याची शक्यता वाढली आहे.मात्र त्यांनी आपला कार्यभार हाती घेतला नाही तोच त्यांना वेश्या व्यवसाय करणाऱ्या टोळक्याने सलामी दिली आहे.व त्यासाठी निमित्त झाले ते शिर्डी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके.त्यांनी आधी शिर्डीत असाच उच्च वर्गीय वेश्या व्यवसाय उघड करून शिर्डी येथील अवैध व्यवसाय करणाऱ्यांना चपराक दिली होती.त्यातच कोपरगावात आता एवढेच गुन्हे बाकी होते तेही उघड झाल्याने अटक कोपरगाव शहर आता कोणत्याच बाबतीत कमी राहिले नाही सर्व बाजूनी प्रगती केल्याचे उघड झाले आहे.

दरम्यान आरोपी विजय मवाळ याने आपल्या ‘हॉटेल कल्पतर याचा वापर करून त्या ठिकाणी खोल्या उपलब्ध करून देऊन वेश्या व्यवसायाला रान मोकळे करून दिले असल्याचे उघड झाले आहे.त्याची गुप्त खबर पोलिसांना लागल्यावर त्यांनी त्या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून त्या ठिकाणीच पर्दाफाश केला आहे.त्यात एका शेजारच्या जिल्ह्यातील तर अन्य एक पश्चिम बंगाल मधील अशा दोन तरुणींना जेरबंद केले आहे.त्यामुळे कोपरगाव शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस कर्मचारी सुनंदा विजय धराडे (वय-२६) यांनी आरोपी विरुद्ध गुन्हा क्रं.३८५/२०२३ स्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम कलम ३,४,५,७,८ प्रमाणे आरोपी मवाळ याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.त्याचे कडील दोन मुली यातील एकसंभाजी नगर येथील एक (वय-२६)व एक पश्चिम बंगाल येथील एक (वय-२३)अशा दोन तरुणी वर कारवाई केली आहे व त्यांचेकडील मोबाईल,सिमकार्ड,रोख रक्कमेसह ४० हजार ३८० रुपयांचे काही आक्षेपार्ह साहित्य जप्त केलं आहे.पुढील तपास शिर्डी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी मिटके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close