जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

तांत्रिक युगात मुलींनी सतर्क राहण्याची गरज-अड्.सौ.शिंदे

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

वर्तमान तांत्रिक युगात विशेषता मुलींनी सतर्क रहाणे तसेच कायद्यासंदर्भात त्यांना ज्ञान असणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन ऍड.राजश्री शिंदे यांनी कोपरगाव येथील सोमैय्या महाविद्यालयात एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“बहिणाबाई चौधरी,सुधा मूर्ती या स्त्री-पुरुष समानतेच्या जीवंत उदाहरण असून त्यांचा आदर्श युवा पिढीने घेतला पाहिजे.स्त्री-पुरुष समानतेबाबत युवा पिढीने जागरूक असणं फार महत्त्वाचे आहे”-अड्.राजश्री शिंदे,कोपरगाव न्यायालय.

कोपरगाव येथील कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीच्या के.जे.सोमैया महाविद्यालयाच्या महिला तक्रार निवारण कक्ष व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्त्री-पुरुष समानता: कायद्यातील तरतुदी’ या विषयावर आयोजित एक दिवसीय कार्यशाळेत प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की,“बहिणाबाई चौधरी,सुधा मूर्ती या स्त्री-पुरुष समानतेच्या जीवंत उदाहरण आहेत व त्यांचा आदर्श युवा पिढीने घेतला पाहिजे.स्त्री-पुरुष समानतेबाबत युवा पिढीने जागरूक असणं फार महत्त्वाचे आहे.कौटुंबिक हिंसा प्रतिबंधक कायदा,संपत्तीत मुलींचा हक्क कायदा,माहिती व तंत्रज्ञान कायदा इत्यादी कायद्यांची माहिती विद्यार्थींनीना असणे गरजेचे आहे.

सदर प्रसंगी प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करतांनाच महाविद्यालयात विद्यार्थींनीसाठी राबवले जाणाऱ्या विविध उपक्रमाच्याही माहिती दिली. तसेच महिलांची सुरक्षितता महत्त्वाची आहे असेही प्रतिपादित केले.

सदर प्रसंगी महिला तक्रार निवारण कक्षाच्या प्रमुख प्रा.डॉ.सुरेखा भिंगारदिवे यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले.तर सदस्य प्रा.नीता शिंदे यांनी आभार व्यक्त केली.प्रा.प्रज्ञा कडू यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्रा.वर्षा आहेर,रजिस्ट्रार डॉ.अभिजीत नाईकवाडे,प्रा.एस.जी.कोंडा,प्रा.आर.ए.जाधव,प्रा.वृषाली पेटकर,प्रा.पूजा गख्खड आदींनी परीश्रम घेतले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close