जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

गोदावरी नदी काठी तरुणांचा मृतदेह,कोपरगाव पोलिसांत नोंद

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत शृंगेश्वर मंदिराच्या जवळ गोदावरी नदी काठी नुकताच एका अनोळखी पस्तीस वर्षीय तरुणाचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळून आला आहे.त्यामुळे संवत्सर व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.हा ‘घात’ की ‘अपघात’ या बाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

संवत्सर येथील नदीकाठी असलेले शव पोलिसांनी ताब्यात घेऊन कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केला असून सदर मृतदेह हा कोपरगाव शहरातील उपनगर असलेल्या गांधीनगर येथील असून तो शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख स्व.शंकर घंगारे यांचा पुतण्या असल्याचे माहितगार सूत्रांनी दिली आहे.व तो मनोरुग्ण होता अशी माहिती प्राप्त झाली आहे.मात्र तो नदीत कसा वहात गेला हे समजले नाही.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,संवत्सर शिवारात काही नागरिकांना माहिती मिळाली की,शुंगेश्वर मंदिरानजिक एक तरुणांचा मृतदेह वरघुडे या शेतकऱ्याच्या शेताजवळ काटेरी झाडाला लडकलेल्या अवस्थेत लटकलेला आहे.त्यानुसार संवत्सर येथील पोलीस पाटील बंडू आचारी यांनी याबाबत खबर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात खबर दिली होती.त्यानुसार शहर पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली असतां त्या ठिकाणी दिलेली बातमी खरी निघाली आहे.त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे.मात्र सदर तरुणांचा मृतदेह कमरेच्या खाली प्राण्यांनी छिन्नविच्छिन्न केल्याचे आढळून आले आहे.

सदर शव पोलिसांनी ताब्यात घेऊन कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केला असून सदर मृतदेह हा कोपरगाव शहरातील उपनगर असलेल्या गांधीनगर येथील असून तो शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख स्व.शंकर घंगारे यांचा पुतण्या असल्याचे माहितगार सूत्रांनी दिली आहे.व तो मनोरुग्ण होता अशी माहिती प्राप्त झाली आहे.मात्र तो नदीत कसा वहात गेला हे समजले नाही.

याबाबत कोपरगाव शहर पोलिसांनी याबाबत आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यू नोंद क्रं. /२०२२ सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासदुदेव देसले यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस हे.कॉ.शेवाळे हे करीत आहेत.

बातमी अद्यावत होत आहे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close