शैक्षणिक
…या विद्यालयात शिक्षक दिन साजरा !
न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव नगरपरिषदेच्या माधवराव कचेश्वर आढाव माध्यमिक व तांत्रिक विद्यालयात शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.यावेळी विद्यालयाचा माजी विद्यार्थी राजेश किसनराव मंजुळ याने रसायनशास्त्र या विषयात डॉक्टरेट मिळविल्याबद्दल नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी मनोजकुमार पापडीवाल,माजी शिक्षक प्रमोदकुमार पाटील,विनायक गायकवाड,उत्तर नगर जिल्हा भाजपा उपाध्यक्ष,विनीत वाडेकर,वसंत जाधव,शेजवळ सर,अनिल वायखिंडे मुख्याध्यापक भावना गवांदे आदींच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला आहे.
`गुरु ब्रह्मा,गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात परब्रह्म तस्मैः श्री गुरुवेः नमः। भारतीय संस्कृतीत आईनंतर सर्वांत महत्त्वाचे स्थान आहे ते गुरुला.आई जशी मुलांवर संस्कार करते, तसा गुरु हा मुलांना घडवण्याचे, त्यांना सक्षम करण्याचे काम गुरु करतो.जीवनाला दिशा देण्यात आणि आपली जडणघडण करण्यात गुरुचा वाटा खूप मोठा असतो. त्यामुळे शिक्षक दिनाला भारतीय संस्कृतीत अधिक महत्त्व आहे.भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच,५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो.शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.शिक्षक दिनाच्या दिवशी विद्यार्थी आपल्या गुरुजनांबद्दल आदराची आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करतात.तसेच शिक्षकांच्या भूमिकेचे महत्त्व आणि भविष्यातील पिढ्यांच्या जागरुकतेसाठी हा दिवस साजरा केला जातो.कोपरगाव येथील माधवराव आढाव विद्यालयात तो मोठया उत्साहात संपन्न झाला आहे.त्यावेळी माजी विद्यार्थी राजेश मंजुळ यांचा हा सत्कार करण्यात आला आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्याधिकारी मनोजकुमार पापडीवाल होते.
सदर प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्रमोद पाटील हे होते तर यावेळी विद्यालयातील शिक्षक जयश्री जाधव,अलका भोसले,अर्चना बोराडे,वर्षा निकुंभ,पौर्णिमा लोणारी,नितीन बोरफळकर सर,प्रमोद लष्करे सर,कर्पे सर,मोरे सर,शिंदे सर,प्रशांत शिंदे सर,अमित पराई,मारुती काटे,महेश चव्हाण,गयाबाई नरोडे,श्रीमती बच्छाव आदी शिक्षकांचा विद्यालयातील इ.10 वी च्या विद्यार्थ्यांनी पेन व गुलाबपुष्प देऊन सत्कार केला.
दरम्यान यावेळी विद्यालयातील जेष्ठ क्रीडा शिक्षक चंद्रकांत शेजवळ व तांत्रिक विभागाचे कर्मचारी अनिल वायखिंडे हे विद्यालयाच्या प्रदीर्घ सेवे नंतर सेवानिवृत्त झाले त्याबद्दल त्यांनाही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल,श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.त्याच बरोबर शिक्षण मंडळ शाळा क्रं 5 चे मुख्याध्यापक माळी सर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला त्याबद्दल त्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुहास जगताप,प्रशासनाधिकारी श्रीराम थोरात यांनी भ्रमणध्वनी द्वारे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदींना शुभेच्छा दिल्या आहेत,
सदर प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्तविक भावना गवांदे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अर्चना बोराडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार जाधव मॅडम यांनी मानले आहे.