शैक्षणिक
कोपरगावात…या संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मदत

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील लेख परीक्षक दत्ता खेमनर संस्थापक असलेल्या “हेल्पिंग हँड्स” या प्रसिद्ध संस्थेच्या वतीने कोपरगाव येथील कृष्णाई मंगल कार्यालयात नुकत्याच संपन्न झालेल्या कार्यक्रमात हुशार,होतकरू व गरीब मुलांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला आहे.

दरम्यान संस्थेने आज अखेर अशा गरजू,होतकरू व हुशार विद्यार्थांना एकूण रु.५१ लाख १७ हजार रुपयांची मदत केलेली आहे.कोरोना काळात एका विद्यार्थ्याला मुत्र पिंड शस्त्र क्रियेसाठी १ लाख ७५ हजाराची मदत मिळवून दिली होती. संस्थेची आज पर्यंतची एकूण मदत रूपये ५२ लाख ९२ हजार झालेली आहे.
सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून मनीलाल नानावटी व्होकेशनल ट्रेनिंग सेंटरच्या संचालिका शोभा सुपेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती तर अध्यक्ष म्हणून कोपरगाव पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,संस्थेचे अध्यक्ष तथा लेखा परीक्षक दत्ता खेमनर आदींसह नागरीक विद्यार्थी बहू संख्येने उपस्थित होते.
सदरच्या कार्यक्रमात आज ३८ विद्यार्थ्यांना ७ लाख ४० रुपये मदतीचे धनादेश देण्यात आले आहेत.तर संस्थेच्या वतीने दोन मुलींना १ लाख ४० रु.चे शैक्षणिक कर्जे संस्थेच्या हमीवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.त्यामुळे यावर्षी एकूण मदत रू. ०८ लाख ८० हजार देण्यात आलेली आहे.
दरम्यान संस्थेने आज अखेर अशा गरजू,होतकरू व हुशार विद्यार्थांना एकूण रु.५१ लाख १७ हजार रुपयांची मदत केलेली आहे.कोरोना काळात एका विद्यार्थ्याला मुत्र पिंड शस्त्र क्रियेसाठी १ लाख ७५ हजाराची मदत मिळवून दिली होती. संस्थेची आज पर्यंतची एकूण मदत रूपये ५२ लाख ९२ हजार झालेली आहे.या संस्थेच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सदर कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र कोयटे यांनी केले तर आभार विट्ठल शिंदे यांनी मानले आहे.