निधन वार्ता
कोपरगावच्या…या माजी आमदार पत्नीचे निधन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्याचे माजी आमदार.स्व.मोहनराव आबासाहेब गाडे यांच्या धर्मपत्नी श्रीमती सुलोचना गाडे (वय-८९) यांचे नुकतेच पहाटे १.१८ वाजता नाशिक येथील साईबाबा रुग्णालयात उपचार सुरु असताना निधन झाले आहे.त्यांच्यावर कोपरगाव येथील स्मशान भूमीत आज सांयकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
स्व.आ.मोहनराव गाडे यांच्या राजकीय जीवनात त्यांनी एखाद्या पहाडा प्रमाणे साथ दिली होती.त्यांची प्रकृती अलीकडील काळात ढासळली होती.त्यांना जवळच्या नातेवाईकांनी नाशिक येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते.तेथे उपचार सुरु असताना मात्र त्यांनी उपचाराला प्रतिसाद दिला नाही अखेर मध्यरात्री १.१८ वाजता त्याची प्राणज्योत मालवली आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्यांना मुलबाळ नव्हते.