जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

४२ हजारांची अवैध दारू जप्त,कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव हद्दीत मोतीनगर या उपनगरात अवैध दारू निर्माण केली जात असल्याची माहिती प्राप्त होताच त्या ठिकाणी तालुका पोलिसांनी धाड टाकली असता त्या ठिकाणी आरोपी जानू ओपीन पिंपळे (वय-३६) हा रंगेहात पकडला गेला असून त्याच्यावर कोपरंगाव तालुका पोलिसानी गुन्हा दाखल केला आहे.व त्याच्याकडून सुमारे विविध साहित्यासह ४२ हजारांचा ऐवज जप्त केला आहे.त्यामुळे कोपरगाव तालुका पोलीस अधिकाऱ्यांचे कौतुक होत आहे.

सुरेगाव शिवारात आरोपी अवैध दारू बनवताना विविध रसायनासह रंगेहात पकडला आहे व त्याच्याकडून ०३ हजार रुपये किमतीचे ६० लिटर गावठी दारू बनविण्यासाठी आवश्यक असलेले रसायन,०४ हजार रुपये किमतीचे प्लास्टिक ड्रम मध्ये असलेले १०० रुपये लिटर किंमत असलेले ४० ली.रसायन सापडले आहे.३५ हजार रुपये किमतीचे प्लास्टिक ड्रम मध्ये असलेले ७०० लिटर असलेले ५० ली.रुपये किंमत असलेले रसायन असा एकूण ४२ हजारांचा विविध बाटल्यासह अवैज सापडला आहे.

सदरचे सविस्तर वृत असे की,कोपरगाव शहरात चारचाकी व दुचाकी वाहनांची चोरी थांबण्याचे नाव घेत नाही असेच चित्र तयार झाले असून राजकीय नेत्यांचा पोलिसांवर आणि पोलिसांचा चोरट्यांवर धाक राहिलेला दिसत नाही त्यामुळे कोपरगाव शहरात पुन्हा एकदा चोरट्यांनी आपले प्रताप दाखविण्यास सुरुवात केली आहे.हे कमी की काय अवैध व्यावसायिकांनी आपला हात उचलून घेतला आहे.तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध व्यवसाय वाढला असून या विरुद्ध कोपरगाव तालुका पोलिसांनी आपली वक्रदृष्टी वळवली आहे.अशातच त्यांना गुप्त बातमीदाराकडून खबर मिळाली की,सुरेगाव शिवारात एक आरोपी त्याचे राहते घरात मध्यरात्रीच्या सुमारास अवैध दारू निर्माण करत आहे.त्यानुसार कोपरगाव तालुका पोलिसांनी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड व गृहरक्षक दलाचा जवान रवंदकर आदींनी त्या ठिकाणी काही अंतर पायी जात जाऊन पहाटे २.५० वाजता धावाबोल केला असता त्या बातमीत तथ्य आढळले आहे.

त्याठिकाणी त्यांनी आरोपीस अवैध दारू बनवताना विविध रसायनासह रंगेहात पकडले आहे व त्याच्याकडून ०३ हजार रुपये किमतीचे ६० लिटर गावठी दारू बनविण्यासाठी आवश्यक असलेले रसायन,०४ हजार रुपये किमतीचे प्लास्टिक ड्रम मध्ये असलेले १०० रुपये लिटर किंमत असलेले ४० ली.रसायन सापडले आहे.३५ हजार रुपये किमतीचे प्लास्टिक ड्रम मध्ये असलेले ७०० लिटर असलेले ५० ली.रुपये किंमत असलेले रसायन असा एकूण ४२ हजारांचा विविध बाटल्यासह अवैज सापडला आहे.तो पोलिसानी जप्त केला आहे.

प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(फ) (क)(ड) (ई) प्रमाणे फिर्यादी जयदीप दामोदर गवारे यांनी आरोपी जानू पिंपळे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.जयदीप गवारे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close