निधन वार्ता
चांगदेव जगताप यांचे निधन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील जेष्ठ कार्यकर्ते व प्रगतशील शेतकरी चांगदेवराव नारायण जगताप (वय-९८) यांचे नुकतेचं निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात मुले,मुली असा परिवार आहे.त्यांच्यावर संवत्सर येथील गोदावरी तीरी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
स्व.चांगदेवराव जगताप हे धार्मिक आणि अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचें म्हणून संवत्सर आणि परिसरात परिचित होते.ते संवत्सर येथील बिग बागायतदार विविध कार्यकारी सेवा संसंस्थेचे जवळपास तीस वर्ष अध्यक्ष होते.त्यांना जेष्ठ नेते माजी मंत्री शंकरराव काळे,शंकरराव कोल्हे यांचा सहवास लाभला होता.
त्यांच्या निधनाने संवत्सर आणि परिसरात शोककळा पसरली आहे.तात्यांच्या अंत्यविधी समयी आ.आशुतोष काळे,संवत्सर ग्रामपंचायतीचे उपसरपंच विवेक परजणे,कोपरगाव वकील संघाचे माजी अध्यक्ष शिरिषकुमार लोहकणे आदींसह मोठ्या संख्येने नागरिक,महिला उपस्थित होत्या.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.ते कोपरगाव वकिल संघाचे सदस्य अड्.सूयोग जगताप व आ.काळे यांचे स्वीय सहाय्यक सुजय जगताप यांचे यांचे आजोबा होते.