निधन वार्ता
गंगुबाई सोनवणे यांचे निधन

न्यूजसेवा
संवत्सर-(वार्ताहर)
संवत्सर येथील नऊवारी परिसरातील रहिवासी श्रीमती गंगुबाई विठ्ठलराव सोनवणे यांचे नुकतेच वृध्दापकाळाने निधन झाले.मृत्यू समयी त्यांचे वय ९० वर्षे होते.त्यांच्यावर संवत्सर येथे गोदावरी काठावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
कै.श्रीमती गंगुबाई या प्रगतशील शेतकरी बाळासाहेब सोनवणे व महाराष्ट्र राज्य किसान सेलचे सदस्य आंबादास सोनवणे यांच्या मातोश्री होत्या.धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाने त्या संवत्सर पंचक्रोशीत परिचित होते.त्यांच्या निधनाबद्दल जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे,महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे अध्यक्ष राजेश परजणे,पंचायत समितीचे माजी सदस्य कृष्णराव परजणे,संवत्सर ग्रामपंचायतीचे उप सरपंच विवेक परजणे,सरपंच सुलोचना ढेपले यांनी शोक व्यक्त करुन श्रध्दांजली वाहिली.त्यांच्या पश्चात चार मुले,दोन मुली,सुना,नातवंडे असा परिवार आहे.त्यांचा अंत्यविधीसाठी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.