निधन वार्ता
भास्करराव भिंगारे यांचे निधन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील करंजी येथील रहिवासी व संजीवनी सहकारी कारखाण्याचे विद्यमान संचालक भास्करराव फकिरा भिंगारे (वय-६०) यांचे नूकतेच निधन झाले आहे.त्यांच्या पाच्छात पत्नी,एक मुलगा,एक मुलगी असा परिवार आहे.त्यांच्यावर आज सकाळी ११ वाजता करंजी अमरधाम येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
स्व.भास्करराव भिंगारे हे अत्यन्त मितभाषी व प्रेमळ स्वभावाचे म्हणून तालुक्यात परिचित होते.ते माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे निष्ठावान सहकारी म्हणून ओळखले जात होते.
स्व.भास्करराव भिंगारे हे अत्यन्त मितभाषी व प्रेमळ स्वभावाचे म्हणून तालुक्यात परिचित होते.ते माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे निष्ठावान सहकारी म्हणून ओळखले जात होते.ते गोदावरी कोपरगाव तालुका सहकारी दूध संघाचे माजी संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.