निधन वार्ता
दत्तात्रय कापे यांचे निधन
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील रहिवाशी दत्तात्रय आसाराम कापे (वय-५४ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने निधन नुकतेच निधन झाले आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
ते साईबाबा संस्थानमध्ये कार्यरत होते. अध्यात्मिक सेवावृत्ती आणि मनमिळावू स्वभावासाठी ‘आबा’ या टोपणनावाने पंचक्रोशीत परिचित होते. त्यांच्या अकाली निधनामुळे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात भाऊ, पत्नी, मुले असा परिवार आहे. संतसेवक बाबासाहेब कापे यांचे ते धाकटे बंधू होत.